HW News Marathi
देश / विदेश

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह २ दिवसाच्या जम्मू, काश्मीर- लडाख दौऱ्यावर

नवी दिल्ली | भारत चीनमध्ये गेल्या काही दिवसांपासून तणावाचे वातावरण आहे. अशातच १५ जूनला चीन सोबतच्या चकमकीत भारताचे २९ जवान शहीद झाले. घडलेल्या सर्व घटनेची पाहणी करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लेह दौरा केला होता. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आजपासून (१७ जुलै) दोन दिवसाच्या दौऱ्यावर जम्मू काश्मीर आणि लडाखला जाणार आहे.

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह लाइन ऑफ एक्चुअल कंट्रोल (LAC) परिसराचा दौरा करणार आहेत. येथे राजनाथ सिंह LAC सोबतच LoC देखील जाणार आहेत. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह या अगोदर दिल्लीत सेना प्रमुख, चीफ ऑफ डिफेंस स्टाफसोबत बैठक करून बॉर्डरवर असलेल्या परिस्थितीचा आढावा घेणार आहे.

“दोन दिवसांच्या लडाख आणि जम्मू-काश्मीर दौर्‍यावर रवाना होत आहे. मी सीमेवरील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी काही भागांना भेटी देईन. सीमा भागात तैनात सशस्त्र दलाच्या जवानांशी संवाद साधणार आहे” असे ट्विट राजनाथ यांनी केले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शरद पवारांचे प्रवक्ते आहात का? कॉंग्रेसच्या या प्रश्नाला उत्तर देताना राऊत म्हणतात…

News Desk

‘खेलरत्न पुरस्कारचं नामकरण ही लोकभावना नसून हा तर राजकीय खेळ’, संजय राऊतांची मोदींवर टीका

News Desk

सुशांत सिंह आत्महत्येप्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बातचीत करण्याची चिराग पासवान यांची मागणी

News Desk