मुंबई | राज्य सरकारने विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, मनसे अध्यक्ष राज ठाकरे , भाजप खासदार नारायण राणे यांच्यासह अनेक भाजप नेत्यांच्या सुरक्षा व्यवस्थेत कपात केली आहे. तर राज्य सरकारमधील काही मंत्री, त्यांचे कुटुंबिय यांच्यासह युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांना एक्स दर्जाची सुरक्षाव्यवस्था पुरवण्यात आली आहे. त्यावरुन भाजप आणि मनसेने ठाकरे सरकारवर आणि मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे.
“सरदेसाईंच्या मुलाला सुरक्षा देऊन महाराष्ट्र सरकारने एक महत्वाचं आणि योग्य पाऊल उचललं आहे. त्याला जास्त सुरक्षेची नितांत गरज होती. कारण त्याने मंत्रालयातील अनेक फाईल्स दाबून ठेवल्या आहेत. त्यामुळे अनेक नोकरशाह त्याच्यावर नाराज आणि संतापलेले आहे. त्यामुळे त्याला सुरक्षा पुरवण्याची खऱ्या अर्थाने गरज होती”, असं ट्वीट करत भाजप नेते नितेश राणे यांनी सरकारच्या सुरक्षाव्यवस्थेतील बदलांवरुन टीका केली आहे.
Such a right move by the Maha Gov to increase the security of this certain Sardesai boy!
He surely needs extra security 4 sure.. becz v hear the way he controls the files in mantralaya n since every bureaucrat is frustrated n angry on him he surely needs Protection!
Good Move 👍🏻— nitesh rane (@NiteshNRane) January 11, 2021
तर, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांनीही वरुण सरदेसाई यांना पुरवण्यात आलेल्या सुरक्षेवरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे. कोरोना काळातील राज्य सरकारची मोहीम असलेल्या ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’वरुन देशपांडे यांनी मुख्यमंत्र्यांना टोला लगावला आहेय यावर आता सरकारकडून कोणी काही बोलणार का याकडे सगळ्यांचे लक्ष आहे.
वरुण सरदेसाई यांना दिलेली सुरक्षा म्हणजे "माझे कुटुंब माझी जबाबदारी " हे वाक्य मुख्यमंत्रांनी एकदम गंभीर्यानी घेतलेले दिसतंय…
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) January 11, 2021
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.