HW News Marathi
महाराष्ट्र

माजी आमदार बाळासाहेब सानप यांची भाजप प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती

नाशिक | राज्यात निवडणुकीचे वारे वाहायला लागल्यावर नेते, कार्यकर्ते, आमदार पक्ष बदलत आहेत किंवा आपापल्या पक्षात घरवापसी करत आहेत. नाशिक महापालिका निवडणुकीच्या तोंडावर माजी आमदार बाळासाहेब सानप यांनी भाजपमध्ये घरवापसी केल्याने त्यांना पद काय मिळणार याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा होती. यावर आज (११ जानेवारी) सानपांना भाजपने दुसऱ्या क्रमांकाचे मानाचे पान दिल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. अलीकडेच भाजपमध्ये परतलेले नाशिकचे माजी आमदार बाळासाहेब सानप यांची भाजप प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष या पदी सध्या चंद्रकांत पाटील हे कार्यरत आहेत.

नाशिकमधील भाजपचे माजी आमदार बाळासाहेब सानप यांना गेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्या पक्षाने तिकीट नाकारल्यानंतर ते राष्ट्रवादीचे उमेदवार बनले होते, पण उमेदवारीची संधी मिळूनही त्यांना पराभव बघावा लागला त्यामुळे ते राष्ट्रवादीचा उंबरा सोडून शिवसेनेत दाखल झाले. त्यांच्या येण्याची उपयोगिता सिद्ध न होऊ शकल्याने शिवसेनेतही ते अडगळीतच होते; यामुळे त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला असे म्हटले जात होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मनसेच्या आपत्ती व्यवस्थापनाची राज ठाकरेंकडून घोषणा, कसं असेल पथक?

News Desk

‘गृहखात्यावरून’ राजकारण; ‘त्या’ चर्चांना मुख्यमंत्र्यांनी दिला पूर्णविराम

Manasi Devkar

जखमींना उपचारासाठी 30 हजार खर्च राज्यसरकार देणार

News Desk