नाशिक । कविवर्य कुसुमाग्रज व वसंत कानेटकर यांचे वास्तव्य असलेल्या भूमीत पार पडत असलेले ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दर्जेदार होईल या दृष्टीने शासन स्तरावरून आवश्यक ती मदत मिळवून देत पूर्णपणे सहकार्य केले जाईल असे राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी आज (१० जानेवारी) सांगितले.
छगन भुजबळ यावेळी म्हणाले की, नाशिककर म्हणून आलेल्या पाहुण्यांसाठी योग्य त्या सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याची आपली जबाबदारी आहे. त्यादृष्टीने प्रशासनाच्या वतीने आवश्यक त्या सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल. तसेच संमेलन सुरळीत होण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने नोडल ऑफिसरची नेमणूक करण्यात येऊन पूर्णवेळ याठिकाणी ते काम बघतील असे त्यांनी सांगितले.
पुढे ते म्हणाले की, साहित्य संमेलनासाठी योग्य जागेची निवड करण्यात आलेली आहे. आपल्याकडे येणाऱ्या पाहुण्यांना चांगल्यातल्या चांगल्या सुविधा कशा मिळतील याची आपल्याला काळजी घ्यावी लागणार आहे. त्याचबरोबर सुरक्षिततेच्या दृष्टीने व कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काळजी घ्यावी अशा सूचना दिल्या. यासाठी शासनाकडून संपूर्ण सहकार्य राहील तसेच देशभरातून येणाऱ्या या सर्वांचे स्वागत करण्यास आम्ही इच्छुक आहोत असे त्यांनी यावेळी सांगितले.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.