HW News Marathi
व्हिडीओ

उदयनराजे भोसलेंचा ‘हा’ धक्का भाजप आणि महाविकासआघाडीला सहन होणार का?

खासदार उदयनराजे भोसले यांनी आज अचानक साताऱ्यातील पोवई नाका येथील ग्रेड सेपरेटरचं उद्घाटन करत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी आपल्याला धक्के देण्याची सवय असल्याचं म्हटलं. “कधी कधी मी हे धक्के देतो आणि कधी हे धक्के मलाही बसतात,” असं ते आपल्या स्टाईलमध्ये म्हणाले. “मला धक्के देण्याची सवय आहे. कधी दुसऱ्याला बसतो कधी मला स्वत:ला बसतो. ‘आदत से मजबूर’ म्हणतात तसं आहे. जुन्या सवयी जात नाहीत. मी राजकारण कधी केलं नाही. ते मला जमणारही नाही. मी आजवर समाजकारण केलं. तेही लोकांचं हित नजरेसमोर ठेवून केलं. तेच लक्षात ठेवून माझी पुढील वाटचालही असणार आहे,” असं उदयनराजे म्हणाले.

#UdayanrajeBhosale #Satara #BJP #MahaVikasAghadi #SambhurajDesai #DevendraFadnavis #UddhavThackeray #Shivsena #SharadPawar #BalasahebPatil

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सर्वोच्च न्यायालय सुद्धा यावरून योग्य निर्णय देईल, Neelam Gorhe यांचा विश्वास

Chetan Kirdat

NCP च्या नेत्या आणि भीमा कोरेगाव प्रकरणातील याचिकाकर्त्या सुषमा अंधारेंचा शिवसेनेत प्रवेश

Seema Adhe

गेल्या 30 वर्षापासून मुंबईतील ‘या’ वॉर्डमध्ये शौचालय नाही!, जाणून घ्या HW Marathiचा खास रिपोर्ट

News Desk