HW News Marathi
देश / विदेश

सीएलपी बैठकीत १०० आमदारांनी सचिन पायलट यांना पक्षातून काढण्याची केली मागणी

जयपूर | जयपूरच्या फेअरमोंट हॉटेलमध्ये सुरू असलेल्या कॉंग्रेस विधिमंडळ पक्षाच्या (सीएलपी) बैठकीस उपस्थित असलेल्या १०० आमदारांनी सचिन पायलट यांना पक्षातून काढून टाकण्याची मागणी एकमताने केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

राजस्थानचे उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी आज (१४ जुलै) काँग्रेसच्या आमदारांची दुसरी बैठक वगळली. तसेच, त्यांच्यातील असलेला वाद मिटवण्यासाठी वरिष्ठ नेत्यांनी त्यांच्याशी संपर्क देखील साधला. मात्र, १८ आमदारांसह सचिन पायलट यांनी आजदेखील ही बैठक वगळली आहे.

एका तासाने तहकूब झालेल्या बैठकीच्या अगोदर कॉंग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश पांडे यांनीही पायलट व त्यांच्या समर्थकांना कॉंग्रेसच्या दुसर्‍या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत सहभागी होण्याचे आवाहन केले होते.कॉंग्रेसमधील सूत्रांच्या हवाल्याने इंडिया टुडेने सचिन पायलट यांनी स्वत:साठी मुख्यमंत्रीपद मागितल्याचे म्हटले आहे. त्याशिवाय सचिन पायलट यांनी काँग्रेसचे सरचिटणीस अविनाश पांडे यांना हटवण्याची आणि महत्त्वाच्या पदांवर आपल्या माणसांची नियुक्ती करण्याची मागणी केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Union Budget 2021 | आयकरात ज्येष्ठ नागरिकांना सूट – अर्थमंत्री

News Desk

केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांची प्रकृती खालावल्यानंतर चिराग पासवान यांचे भावनिक पत्र 

News Desk

भारतीयांची युरोपीयन देशांमध्ये जाण्याची अडचण दूर होईल – अदर पुनावाला

News Desk