HW News Marathi
महाराष्ट्र

रोहित पवारांनी केलं मोदींचं कौतुक!

मुंबई | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये Specified Skilled Workers या क्षेत्रासंदर्भातील प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. या प्रस्तावा अंतर्गत काही १४ क्षेत्रातील भारतीयांना फायदा होणार आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी पंतप्रधान मोदींचे कौतुक केले आहे. रोहित पवार म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्र सरकारने Specified Skilled Workers या क्षेत्रातील भागीदारीसाठी जपानसोबत केलेला सहकार्य करार स्वागतार्ह आहे. यामुळे भारत व जपान यांच्यात सहकार्य व भागीदारीसाठी संस्थात्मक यंत्रणा उभारली जाणार आहे.

तसेच, आवश्यक कौशल्य प्राप्त केलेले आणि जपानी भाषा अवगत असणारे कुशल भारतीय मनुष्यबळ जपानमधील विविध १४ क्षेत्रांमध्ये काम करण्यासाठी पाठवणे सोपे होईल. या संधीचा फायदा देशातील सर्व राज्यातील युवांना समान पद्धतीने मिळावा, अशी विनंती देखील रोहित पवार यांनी केली आहे. मोदी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बैठकीत Specified Skilled Workers यासंदर्भातील संमतीपत्र मंजूर करण्यात आले. या सामंजस्य करारांतर्गत १४ क्षेत्रांमध्ये कृषी, मत्स्यपालन, नर्सिंग, विमानचालन, इमारतींची साफसफाई, मटेरियल प्रोसेसिंग, औद्योगिक मशिनरी उत्पादन, इलेक्ट्रिकल व इलेक्ट्रॉनिक माहिती उद्योग, बांधकाम, जहाज बांधणी व जहाजबांधणी, वाहन दुरुस्तीचा समावेश आहे. लॉजिंग, अन्न व पेय पदार्थ उत्पादन आणि अन्न सेवा उद्योगांचाही समावेश आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अर्थसंकल्पात मध्यमवर्गीयांना दिलासा मिळण्याची शक्यता

News Desk

‘गर्दी होईल असा एकही राजकीय कार्यक्रम पक्ष घेणार नाही’ – नवाब मलिक

News Desk

खुशखबर! एसटी कर्मचाऱ्यांचे रखडलेले पगार लवकरच मिळणार

News Desk