मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहीत पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र लिहून एक मागणी केली आहे. MPSC परीक्षेच्या खुल्या वर्गासाठीची कमाल मर्यादेची अट रद्द करावी आणि SEBC चा दावा केलेल्या उमेदवारांनी खुला किंवा EWC यापैकी एकच प्रवर्ग निवडावा, या आशयाचं MPSC ने काढलेलं परिपत्रक मागे घ्यावं, अशी विनंती राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केलीय. रोहित पवार यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र लिहिलंय. उपमुख्यमंत्री अजित पवारांनीही यात लक्ष घालण्याचं रोहित पवारांना आश्वासन दिलं आहे.
”महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगामार्फत 30 डिसेंबर 2020 रोजी करण्यात आलेल्या नवीन घोषणेनुसार स्पर्धा परीक्षांना बसणाऱ्या उमेदवारांना कमाल संधीची अट घालण्यात आलेली आहे. खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना कमाल सहा संधी तर एससी, एसटी प्रवर्गातील उमेदवारांसाठी कमाल संधीची कुठलीही अट नसणार आहे. उर्वरित मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी कमाल नऊ संधी उपलब्ध असणार आहेत. मुळात म्हणजे उमेदवारांना कमाल वयाची अट असल्यानं कमाल संधीचे अट घालण्याची आवश्यकता नाही. तसेच कमाल संधीची अट घातल्याने साध्या होण्यासारखे काहीही नाही, उलट कमाल संधीची अट घातल्याने खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांमध्ये अन्यायाची भावना निर्माण झालेली आहे. त्यामुळे कमाल संधीची अट तात्काळ मागे घेणे गरजेचे आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने 4 जानेवारी 2019 रोजी सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गाचा दावा केलेल्या उमेदवारांच्या संदर्भात देखील प्रसिद्धीपत्रक जारी केलेले आहे. या पत्रकानुसार सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गाचा दावा केलेल्या उमेदवारांनी खुला अथवा दृष्ट्या दुर्बल घटक या प्रवर्गापैकी कुठलाही एक प्रवर्ग निवडण्यास सांगण्यात आलेले आहे. यासाठी 5 जानेवारी 2021 ते 15 जानेवारी 2021 पर्यंतचा कालावधी दिलेला आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या उमेदवारांनी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा प्रवर्ग निवडल्यास नंतरच्या काळात संबंधित उमेदवारांना सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गाचा लाभ घेता येणार नसल्याचे स्पष्ट म्हटले आहे.
MPSC परीक्षेसाठी खुल्या वर्गासाठीची कमाल मर्यादेची अट रद्द करावी आणि SEBC चा दावा केलेल्या उमेदवारांनी खुला किंवा EWC यापैकी एकच प्रवर्ग निवडावा, या आशयाचं MPSC ने काढलेलं परिपत्रक मागे घ्यावं, अशी विनंती @AjitPawarSpeaks दादांना केली. याबाबत त्यांनी लक्ष घालण्याचं आश्वासन दिलं. pic.twitter.com/Oksy57Odfs
— Rohit Pawar (@RRPSpeaks) January 5, 2021
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.