HW News Marathi
देश / विदेश

काँग्रेसच्या बैठकीला सचिन पायलट राहणार गैरहजर, पायलट आज भाजपात जाणार ?

नवी दिल्ली | राजस्थानमध्ये राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आणि वेगळेच वळण आले आहे. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीनंतर सत्ताधारी काँग्रेसने काल(१२ जुलै) रात्री उशिरा पत्रकार परिषद घेतली. यावेळी, विधिमंडळ पक्षाच्या बैठकीला हजर राहण्यासाठी काँग्रेसने व्हीप जारी केला. तसेच, दिल्लीवारीवर असलेले राजस्थानचे उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी भाजप नेत्यांच्या भेटीगाठी सुरु केल्याने संभाव्य पक्षांतराच्या चर्चांना उधाण आले आहे. भाजपाध्यक्ष जेपी नड्डा यांच्या उपस्थितीत पायलट यांच्या पक्षप्रवेशाची चिन्हे दिसत आहेत.
राजस्थानातील या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर सचिन पायलट यांनी दिल्लीत येऊन काँग्रेसचे वरिष्ठ नेते अहमद पटेल यांची भेट घेतली. सचिन पायलट यांनी अहमद पटेल यांना भेटून आपली नाराजी व्यक्त केली. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्याबरोबर मतभेद विकोपाला गेल्याचे त्यांनी सांगितले. अहमद पटेल हे काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांचे राजकीय सल्लागार समजले जातात.
आज (१३ जुलै) सकाळी १०.३० वाजता काँग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठक पार पडेल. यानंतर काँग्रेसकडून व्हीप जारी केला जाऊ शकतो. दरम्यान काँग्रेसचे सर्व आमदार माझ्या संपर्कात आहेत. सरकार पूर्णपणे स्थिर असून ५ वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करेल, असा दावा काँग्रेसचे सरचिटणीस आणि राजस्थानचे प्रभारी अविनाश पांडे यांनी केला
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मोदींसाठी निवडणूक आयोगाने पत्रकार परिषदेची वेळ बदलली, काँग्रेसचा आरोप

Gauri Tilekar

Delhi Assembly Elections 2019 : आज दिल्लीकरांचे भवितव्य होणार सीलबंद

News Desk

रोहीत वेमुला दलित नव्हेच!

News Desk