HW News Marathi
Covid-19

पुण्यातील व्यापारी महासंघातर्फे लॉकडाऊनला विरोध, अनलॉक करण्याची प्रशासनाकडे मागणी

पुणे | पिंपरी-चिंचडवड आणि पुणे महापालिका क्षेत्रात मोठ्या प्रमाणात कोरोनाचा फैलावर होत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. कोरोनाची साखळी तोडण्याबाबत काय करता येईल, याबाबत पुण्यात पालकमंत्री अजित पवार यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेत कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर लॉकडाऊन करण्याचे संकेत दिले. यानंतर प्रशासनाने लॉकडाऊन घोषित केला. मात्र पुण्यामध्ये घोषित करण्यात आलेल्या या लॉकडाऊनला येथील व्यापाऱ्यांनी विरोध केला आहे.

पुण्यातील व्यापारी महासंघातर्फे अनलॉक करण्याची मागणी करण्यात येत आहे. लॉकडाऊनमुळे व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे लॉकडाऊन हटविण्याची मागणी त्यांनी केली आहे. व्यापाऱ्यांनी याबाबतचे निवेदन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच प्रशासनाला पाठविले आहे. लॉकडाऊन मुळे व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान होत असून यांचा व्यवसाय धोक्यात आला आहे. व्यापारी वर्ग आर्थिक तसेच मानसिक तणावाखाली आहे, अशा परिस्थितीत पुण्यामध्ये घोषित करण्यात आलेला लोकडाऊन मागे घेण्यात यावा, अशी विनंती व्यापारी महासंघाने केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अवघ्या तासात रेल्वेच्या ऑनलाईन बुकिंग २० जूनपर्यंत गाड्या फुल्ल

News Desk

राज्यात २५ हजार कंपन्यांचे उत्पादन सुरू, सहा लाख कामगार रुजू

News Desk

अमरावतीत आरोग्यमंत्र्यांच्या गाड्यांचा ताफा भाजपने रोकला

News Desk