HW News Marathi
Covid-19

पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांना मिळाला रुग्णालयातून डिस्चार्ज

पुणे | राज्यात कोरोना रुग्ण वाढतच आहेत मात्र कोरिनामुक्त होणाऱ्यांची संख्या देखील वाढत आहे. तसेच, राज्यात मृत्यूचे प्रमाण देखील कमी आहे. राजकीय वर्तुळात कोरोनाने शिरकाव केला. ४ जुलैला पुण्याचे महापौर मुरलीधर यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आणि चिंतेत आणखी भर पडली. मात्र, आज (९ जुलै) त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. कोणतीही लक्षणे दिसत नसल्यामुळे डॉक्टरांनी त्यांना घरी जाण्यास सांगितले. त्याची माहिती त्यांनी स्वतः ट्विट करत दिली आहे.

कोणतीही लक्षणे दिसत नसल्याने आज मला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला. येत्या १५ तारखेपर्यंत होम क्वारंटाईनची सूचना डॉक्टरांकडून मिळाली आहे. उपचार करणाऱ्या डॉक्टर्स आणि टीमचे मनःपूर्वक धन्यवाद! होम क्वारंटाईननंतर पुन्हा एकदा २४ तास आपल्या सेवेसाठी उपलब्ध असेल, याचं नक्कीच समाधान आहे. त्यामुळे लवकरच आता ते पूर्ण बरे होऊन येतील याची नक्कीच खात्री आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शिवसेना खासदार हेमंत गोडसे यांना कोरोनाची लागण 

News Desk

राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा ३३ वरून थेट ३७ वर

News Desk

मुंबईत पालिकेने रुग्ण संख्या आटोक्यात आणण्यासाठी ‘या‘ टिप्स अवलंबल्या

News Desk