HW News Marathi
महाराष्ट्र

मेहबूब शेख यांच्या पाठीशी राष्ट्रवादीचे आमदार खंबीरपणे उभे राहिले 

मुंबई | राष्ट्रवादी कॉंग्रेसचे युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्यावर बलात्काराचा आरोप झाल्यानंतर राष्ट्रवादीच्या गोटात सन्नाटा पसरला होता. मात्र अशातच औरंगाबाद पोलिसांनी पत्रकार परिषद घेऊन तरुणी आणि मेहबूब यांचा संपर्क नसल्याचं स्पष्ट आहे. त्यानंतरलआता राष्ट्रवादीचे युवा नेते मेहबूब यांच्या समर्थनार्थ पुढे आले आहेत.

राष्ट्रवादीचे आमदार युवा नेते रोहित पवार यांनी प्रथमच याप्रकरणी सविस्तर भूमिका मांडली आहे. मागील 1 वर्षात मेहबूब शेख यांचा तरुणीशी कुठलाही संपर्क झालेला नसल्याची माहिती पोलिसांनीच समोर आणली आहे. त्यामुळे विरोधकांनी याप्रकरणाचा राजकीय फायदा घेऊ नये, अशा शब्दात रोहित पवार यांनी भाजपला सुनावलं आहे.

प्रत्येक पीडित महिलेच्या बाजूने आम्ही नेहमीच उभं असतो आणि कुणी चुकत असेल तर त्यावर कारवाईही झालीच पाहिजे; पण महेबूब शेख व संबंधित तरुणीचा वर्षभर संपर्क नसल्याचा खुलासा पोलिसांनीच केला आहे. त्यामुळं विरोधकांनी या प्रकरणाचा राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न करु नये, असं ट्विट रोहित पवार यांनी केलं आहे.

दुसरीकडे राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनीही याप्रकरणावरुन आंदोलन करणाऱ्या भाजपवर जोरदार शरसंधान साधलं आहे. एखाद्याचे चारित्र्यहनन करून आसुरी आनंद लुटणाऱ्यानो हाथरस प्रकरणात तुमचे तोंड शिवले होते का रे?, असा सवाल करत भाजपवर जोरदार टीका केलीय. तुमच्या अनेक आमदार खासदारांच्या कुंडल्या आमच्याकडे आहेत. जेव्हा काढू तेव्हा तोंड दाखवायला जागा राहणार नाही, असा इशारा देत हिरव्या देठाची भाषा महाराष्ट्र विसरला नसल्याचं मिटकरी म्हणाले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आघाडीचे भवितव्य जनतेने एकदा दाखवून दिले आता बिलोलीतही दिसेल- अतुल भातखळकर

News Desk

किरीट सोमय्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला

Aprna

देवेंद्र फडणवीस आणि राज ठकारेंचे सुप्रिया सुळेंनी ‘या’ कारणामुळे मानले जाहीर आभार

Aprna