HW News Marathi
महाराष्ट्र

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे मुंबईतील निवासस्थान राजगृहावर काल झालेल्या तोडफोडीचे राजकीय नेत्यांनी नोंदवला निषेध

मुंबई | विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं मुंबईतील निवासस्थान असलेल्या राजगृहावर काल (७ जुलै) संध्याकाळी अज्ञात व्यक्तींकडून तोडफोड करण्यात आली. यानंतर सर्व स्तरातून निषेध नोंदवला जात आहे. माजी मुख्यमंत्री आणि विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीदेखील याप्रकरणी निषेध नोंदवला असून आरोपींना तात्काळ अटक केली जावी अशी मागणी केली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरच्या माध्यमातून ही मागणी केली आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, “भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान असलेल्या ‘राजगृह’ यावर करण्यात आलेला हल्ला हा अत्यंत निषेधार्य असून आरोपींना तात्काळ अटक व्हावी अशी आमची मागणी आहे”.

तसेच, खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील झालेल्या घटनेचा तीव्र निषेध केला आहे. दादर, मुंबई येथे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान असणाऱ्या ‘राजगृह’ येथे काही अज्ञात समाजकंटकांनी तोडफोड केली. या पवित्र वास्तुची ही अशी तोडफोड होणे हे अतिशय संतापजनक आहे. हे कृत्य करणाऱ्या व्यक्ती व मानसिकतेचा तीव्र निषेध, असे ट्विट त्यांनी केले आहे.

राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दोषींवर कठोर कारवाई करणार असल्याचं म्हटलं आहे. याबाबत गृहमंत्र्यांनी ट्वीट केलं आहे की, “दादर येथील ‘राजगृह’ या डॉ.आंबेडकरांच्या निवासस्थानावर काही अज्ञात व्यक्तींनी आज जो हल्ला केला तो निषेधार्थ आहे. याबाबत पोलिसांचा तत्परतेने तपास सुरु असून दोषींविरुद्ध कठोर कार्यवाही केली जाईल.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“डिपॉझिट जप्त होऊनही माझी आमदार होण्याची इच्छा पूर्ण झाली”

News Desk

राज्यात जीवनावश्यक वस्तूसह औषधांची कोणतीही टंचाई नाही, राज्य सरकारचे जनतेला आश्वस्त करणारे पत्रक

News Desk

आत्महत्त्याग्रस्त शेतकरी कुटूंबियांना पोलिस अधिकाऱ्याची मदत

News Desk