HW News Marathi
महाराष्ट्र

३१ डिसेंबर साजरा करताय? मग राज्य शासनाचे हे ‘१०’ नियम आधी पाहा! 

मुंबई | एकीकडे संपूर्ण जग कोरोनाच्या संकटाशी झटत आहे. कोरोना संकटात आज संपूर्ण जग नववर्षाच्या स्वागताची तयारी करत आहे. मात्र कोरोना संकट अद्यापही पूर्ण टळलं नसल्यानं बंधनं पाळावी लागणार आहेत. मुंबईतही नववर्षाचं सेलिब्रेशन करताना काही अटींचं पालन करावं लागणार आहे. खेड्यापाड्यापासून शहरांपर्यंत सगळ्यांनाच या वेळी नवीन वर्षाचं स्वागत साध्या पद्धतीने करावं लागणार आहे. कोरोनाच्या संकटामुळे गृहखात्याने काही नियम सांगितले आहेत. ते पाळणे आवश्यक असणार आहेत.

महाराष्ट्रात ३१ डिसेंबरसाठी महत्वाचे १० नियम काय आहेत ?

१) करोनाच्या अनुषंगाने दिनांक ३१ डिसेंबर २०२० रोजी सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी व १ जानेवारी २०२१ रोजी नवीन वर्षाच्या स्वागताच्या निमित्ताने नागरिकांनी घऱाबाहेर न पडता नववर्षाचे स्वागत घरी साधेपणे करावे.

२) मुंबई आणि इतर महानगरपालिका क्षेत्रात यापूर्वीच 5 जानेवारी 2021 पर्यंत नाईट कर्फ्यू अर्थात रात्रीची संचारबंदी लावण्यात आली आहे.त्यामुळे रात्री 11 ते 6 तुम्हांला बाहेर पडता येणार नाही.

३) राज्य सरकारनं आवाहन केलं आहे, की दहा वर्ष वयाखालची मुलं आणि 60 वर्षांहून अधिक वयाच्या नागरिकांनी नवीन वर्षाच्या सायंकाळी घराबाहेर पडणं टाळावे.

४)धार्मिक किंवा सांस्कृतिक रॅलीज काढण्याची परवानगी मिळणार नाही.

५) जवळपास 35000 मुंबई पोलीस कर्मचारी कायदा आणि सुव्यवस्थेची अंमलबजावणी होतेय की नाही यावर लक्ष ठेवण्यास रस्त्यावर तैनात

६) नाईट कर्फ्यूबाबतच्या प्रतिबंधांनुसार पब्स आणि इतर हॉटेल्सना मुंबईत ३१ डिसेंबरच्या रात्री केवळ ११ वाजेपर्यंतच परवानगी असेल.

७) मुंबईकरांना गेटवे ऑफ इंडिया, मरिन ड्राइव्ह, गिरगाव चौपाटी अशा त्यांच्या आवडत्या ठिकाणी जाता येईल. मात्र चारहून अधिक लोकांना एकत्र फिरता येणार नाही.

८) पुणे महानगरपालिकेच्या क्षेत्रामधील उद्याने मैदाने अशा सार्वजनिक ठिकाणी सोशल डिस्टन्स पाळाव लागणार आणि मास्क लावावा.

९) पुण्यात ३१ डिसेंबरला हॉटेल, फुड कोर्ट, रेस्टोरंट रात्री 10.45 पर्यंत सुरु राहणार

१०) ) फटाक्यांची आतिषबाजी करण्यात येवू नये. ध्वनी प्रदुषणासंदर्भातील नियमांचे व तरतुदींचे काटेकोर पालन करण्यात यावे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सीताराम कुंटे यांची प्रधान सल्लागारपदी नियुक्ती

News Desk

मराठा आरक्षणप्रश्नी आज संभाजीराजे आणि मुख्यमंत्री यांच्यात वर्षा निवासस्थानी बैठक

News Desk

“तो निर्णय चुकीचा होता.. पाठीत खंजीर खुपसला गेला होता!”, फडणवीसांची त्या शपथविधीवर प्रतिक्रिया

News Desk