मुंबई | यूजीसीच्या (विद्यापीठ अनुदान आयोग) परीक्षा व शैक्षणिक कॅलेंडरच्या सुधारित मार्गदर्शक सूचनांनुसार देशातील विद्यापीठ आणि उच्च शिक्षण संस्थांना सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यूजीसीने घेतलेल्या या निर्णयाला काही जणांनी संमती दाखवली तर काही जणांनी विरोधा दर्शवला. युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांनी ट्वीट करत यूजीसीने घेतलेल्या निर्णयाला विरोध दर्शवला आहे. ‘देश जगभरातील सर्वाधिक रुग्ण असणाऱ्या देशांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्यांना विद्यार्थांच्या जीवाची अजिबात काळजी नाही का?’, असा प्रश्न वरुण सरदेसाई यांनी उपस्थित केला आहे.
Shocked and appalled by the decision of Central Govt to ‘compulsorily’ conduct Final year exams!!
This at a time when India has reported 7Lakh cases and is the third worst affected country in the world!
Do they not care about #StudentLives at all??? pic.twitter.com/ysGp763usA— Varun Sardesai (@SardesaiVarun) July 6, 2020
यूजीसीने अंतिम वर्षाच्या परिक्षांबाबत घेतलेल्या निर्णयाचं भाजप नेते आशिष शेलार यांनी मात्र समर्थन केलं आहे. देशातील विद्यार्थ्यांना नोकरी, उच्च शिक्षणात समान संधी मिळावी म्हणून विद्यापीठ अनुदान आयोगाने ‘एकसूत्री’ निर्णय घेतला. शैक्षणिक आरोग्या सोबत विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी करुन सप्टेंबर पर्यंत कालावधी वाढवून दिला. आता नोकरीच्या संधीत महाराष्ट्राचे विद्यार्थी मागे पडू नये.’ पुढिल ट्वीटमध्ये ते म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी केंद्राकडे गाईडलाईनची मागणी पत्राने केली होती. आता राज्यातील विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही, याची काळजी मुख्यमंत्र्यांनी घ्यावी. राज्य सरकारच्या निर्णयात कुलपती, कुलगुरूंना अनभिज्ञ ठेवून युजीसीच्या गाईडलाईन प्रमाणे तो निर्णय नव्हता हे स्पष्ट झाले!’
मा.मुख्यमंत्र्यांनी केंद्राकडे गाईडलाईनची मागणी पत्राने केली होती. आता राज्यातील विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही,याची काळजी मुख्यमंत्र्यांनी घ्यावी. राज्य सरकारच्या निर्णयात कुलपती, कुलगुरूंना अनभिज्ञ ठेवून युजीसीच्या गाईडलाईन प्रमाणे तो निर्णय नव्हता हे स्पष्ट झाले! (2/3)
— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) July 7, 2020
निर्णया संदर्भातील आपल्या शेवटच्या ट्वीटमध्ये आशिष शेलार यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, ‘राज्य सरकार एटीकेटीच्या विद्यार्थ्यांना नापास करणार होते? ते सुदैवाने आता बचावले. आधी घोषणा, मग निर्णय, मग गृहपाठ यामुळे जो विद्यार्थ्यांना गेले तीन महिने मनस्ताप झाला. विद्यार्थी भयभीत आहेत त्यांना संभ्रमातून बाहेर काढा.आता तरी सु-सूत्रे योग्य नियोजन करा!!’ असा सल्लाही ठाकरे सरकारला आशिष शेलार यांनी दिला आहे.
राज्य सरकार एटीकेटीच्या विद्यार्थ्यांना नापास करणार होते? ते सुदैवाने आता बचावले.
आधी घोषणा, मग निर्णय, मग गृहपाठ यामुळे जो विद्यार्थ्यांना गेले तीन महिने मनस्ताप झाला. विद्यार्थी भयभीत आहेत त्यांना संभ्रमातून बाहेर काढा…आता तरी सु-सूत्रे योग्य नियोजन करा!!
(3/3)— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) July 7, 2020
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.