मुंबई | राज्यात राजकीय नेत्यांना देखील कोरोनाची लागण होण्यास सुरुवात झाली आहे आणि काही नेत्यांचे मृत्यू देखील झाले आहेत. माजी मंत्री सुरेश आमोणकर यांचे कोरोनामुळे काल (६ जुलै) निधन झाले. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी माजी मंत्र्यांना आदरांजली अर्पण केली आहे. वयाच्या ५८ व्या वर्षी कोरोनामुळे आमोणकरांचे निधन.
Deeply saddened by the passing away of Dr. Suresh Amonkar, former President of BJP Goa Pradesh and Former Cabinet Minister of Goa Govt. His contribution to the state of Goa is immense and will never be forgotten. I express my heartfelt condolences to the bereaved family.
— Dr. Pramod Sawant (@DrPramodPSawant) July 6, 2020
राज्याचे माजी आरोग्य मंत्री व गोवा भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष डॉ. सुरेश आमोणकर यांचे काल रात्री मडगावच्या कोविड रूग्णालयात निधन झाले. आमोणकरांना मूत्रपिंडाचा त्रास होता पण त्यातच त्यांना कोरोनाची लागण झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. कोरोनामुळे मृत पावणाऱ्यांची गोव्यातील संख्या ८ झाली आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.