HW News Marathi
Covid-19

बुलढाणा जिल्ह्यात ७-२१ जुलै लॉकडाऊन जारी

बुलढाणा | कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्यात अनेक भागात पुन्हा लॉकडाऊन जारी करण्यात आला. बुलढाणा जिल्ह्यात अलीकडच्या काळात कोरोना रुग्णांच्या प्रमाणात वाढ होत असल्याने जिल्हा प्रशासनाने लॉकडाऊन जाहीर केला आहे. ७ जुलै ते २१ जुलै २०२० च्या मध्यरात्री १२ वाजेपर्यंत संपूर्ण लॉकडाऊन लागू करण्यात येत आहे. या लॉकडाऊन कालावधीत नागरिकांनी नियमांचे पालन करावे असे आवाहन पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी केले .

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियाेजन समिती सभागृहात पालकमंत्री यांच्या पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते. दुपारी ३ ते दुसऱ्या दिवशी सकाळी ९ वाजेपर्यंत अत्यंत कडक कर्फ्यू लागू असणार आहे. अत्यावश्यक सेवा असणाऱ्या नागरिकांना लॉकडाऊन कालावधीत प्रशासनाकडून पासेस वितरित करण्यात येतील, अशी माहिती देखील त्यांनी दिली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘या’ राज्यातून १२०० जणांना झारखंडला नेण्यासाठी पहिली नॉनस्टॉप विशेष ट्रेन रवाना

News Desk

Omicron Variant : कर्नाटकात ओमीक्रॉनचे दोन रुग्ण; केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची माहिती

News Desk

राज्याची चिंता अधिकच वाढली ! आज नव्या कोरोनाबाधितांची संख्या ६० हजारांजवळ

News Desk