HW News Marathi
Covid-19

भाजपचे विधानसभेचे माजी आमदार योगेश टिळेकर कोरोना पॉझिटिव्ह

पुणे | एका मागोमाग एक राजकीय नेत्यांना देखील कोरोनाची लागण होण्यास सुरुवात झाली आहे. भाजपचे पुण्यातील हडपसर विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार योगेश टिळेकर यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यांनी स्वतः ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे. भाजपाच्या नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या प्रदेश कार्यकारिणीत योगेश टिळेकर यांना ओबीसी आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

दोन दिवसापूर्वी ताप व कणकण आल्याने माझी व मुलाची #COVIDー19 ची तपासणी करून घेतली असतात तपासणी अहवाल पॉसिटीव्ह आला. माझी प्रकृती स्थिर आहे. तुमच्या आशिर्वादामुळे लवकरच बरा होऊन येईन. आपण सर्वांनी काळजी घ्यावी व सुरक्षित राहावे, असे त्यांनी ट्विट केले आहे.

 

कालच (४ जुलै) पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांचाही कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता.एकामागोमाग एक राजकीय नेत्यांना कोरोनाची लागण होत असल्याकारणाने राजकीय क्षेत्रात चिंतेचे वातावरण वाढत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मद्य प्रेमींसाठी खुशखबर, मद्य खरेदीसाठी ई-टोकन सुविधा सुरु !

News Desk

आरोग्यमंत्री राजेश टोपे आज पुण्यातील NIV आणि नायडू हॅास्पिटलला भेट देणार

Arati More

बारामतीमध्ये १६ जुलैपासून १० दिवस लॉकडाऊन !

News Desk