पुणे | पुणे शहरातील कोरोनाबाधितांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या पुण्यात २० हजारांच्या पुढे गेली आहे. तर ६०० पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला आहे. पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. अशातच पुण्यातील कंटेनमेंट झोनमध्ये वाढ झाली आहे. काल पुण्यात तब्बल ५० कंटेनमेंट झोन वाढले. पुण्यात आता एकूण १०९ कंटेनमेंट झोन झाले आहेत. शहरात १७ जूनपर्यंत कंटेनमेंट झोनची संख्या ७४ इतकी होती. ती संख्या कमी होण्याऐवजी वाढली आहे आणि चिंता वाढत चालली आहे.
पुण्यात आज (३ जुलै) विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये उपमुखयमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. यावेळी पुण्यात रुग्णांची वाढती संख्या आणि वाढणारे कंटेंटमेंट झोन याबद्दल चिंताही व्यक्त करण्यात आली. तसेच, पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत कंटेनमेंट झोनमध्ये जाण्या-येण्याचे मार्ग बंद करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत.
पुण्यातील कंटेनमेंट झोन –
सदाशिव पेठेतील राजेंद्रनगर, मनपा कॉलनी, पर्वती दर्शन परिसरातील चाळ क्रमांक ६७, ७०, ९३, ९९, १०७, साईबाबा वसाहत परिसर, गणेश पेठेतील संत कबीर चौक ते डुल्या मारुती चौकापर्यंतचा लक्ष्मी रस्ता, नेहरू रस्ता परिसर, घोरपडी येथील शक्तिनगर परिसर, ढवळे वस्ती, हडपसरमधील सव्र्हेक्षण क्रमांक २८२, मुंढवा परिसर, अरण्येश्वर येथील तावरे कॉलनी परिसर, शाहू कॉलेज रस्ता परिसर, कात्रज परिसरातील अय्यप्पा मंदिरालगतचा परिसर, शिवशंकर कॉलनी, बिबवेवाडी ओटा वसाहत, अपर इंदिरानगर, व्हीआयटी कॉलेज परिसर.
येरवडा येथील अशोकनगर, भाटनगर, गणेशनगर, रामनगर, जय जवान नगर, यशवंतनगर, पर्णकु टी पायथा, शनी आळी, गवळीवाडा, हडपसरमधील अण्णा भाऊ साठे वस्ती, लक्ष्मीनगर, संगमवाडी, शिवाजीनगर, वाक डेवाडी, संभाजीनगर, महापालिका वसाहत, खराडीमधील थिटे वस्ती, थिटेनगर, भेकराईनगर, कोंढवा बुद्रुक, बिबवेवाडी येथील चैत्रबन परिसर, एरंडवणे येथील एसएनडीटी महाविद्यालय परिसर, कर्वे रस्त्याचा काही भाग, कोथरूड येथील हॅप्पी कॉलनीजवळील वसाहत, सिंहगड रस्त्यावरील हिंगणे बुद्रुक, पौड फाटा, मेगा सिटी, के ळेवाडी, राजीव गांधी वसाहत, डहाणूकर कॉलनी या भागाचा कंटेनमेंट झोनमध्ये समावेश आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.