HW News Marathi
महाराष्ट्र

दानवेंचा पराभव करत नाही तोवर …शिवसेनेच्या मंत्र्यांने उचलला विडा!

धुळे | भाजपचे खासदार रावसाहेब दानवे हे सतत वादग्रस्त वक्तव्यांने चर्चेत असतात.राज्यातील महाविकासआघाडी सरकारवर ते सतत टिका करत असतात.आता मात्र शिवसेनेचा मंत्री असलेल्या अब्दुल सत्तार यांनी थेट दानवेंना आव्हान दिलय. जोपर्यंत रावसाहेब दानवे यांचा पराभव करत नाही, तोपर्यंत डोक्यावरची टोपी काढणार नाही, अशी गर्जनाच मंत्री अब्दुल सत्तार यांनी केली आहे. त्यामुळे आगामी काळात मराठवाड्यातील राजकारण अधिकच तापणार असल्याची चिन्हे दिसत आहेत.

सध्या राज्यात ग्रामपंचायत निवडणुकीचे बागुल वाजले आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धुळ्यात शिवसेनेचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी अब्दुल सत्तार यांनी थेट भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडताना रावसाहेब दानवे यांनाही ललकारले. जोपर्यंत रावसाहेब दानवे यांचा पराभव करत नाही, तोपर्यंत डोक्यावरची टोपी काढणार नाही, असं सत्तार म्हणाले.त्यामुळे आता रावसाहेब दानवे अब्दुल सत्तारांच्या या आव्हानाला काय प्रत्युत्तर देणार हे पाहण महत्वाचं ठरणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“शरद पवार आणि उद्धव ठाकरेंनी वसुली करण्यास सांगितलं असं अनिल देशमुखांनी थेट सांगावं”

News Desk

“मग कल्याण म्हणाला असता, दादा तुम्हीही पहाटे शपथविधीला होता”

News Desk

उद्धव ठाकरेंचा पंढरपूर दौरा रद्द, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार शासकीय महापूजा

News Desk