HW News Marathi
महाराष्ट्र

इंदोरीकर महाराजांना पुत्र प्राप्तीबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी ७ ऑगस्टला कोर्टात हजर राहण्याचे आदेश

नाशिक | नेहमीच वादाच्या भोवऱ्यात असणारे इंदोरीकर महाराज पुन्हा एकदा अडचणीत सापडले आहेत. पुत्र प्राप्तीबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी इंदोरीकर महाराज यांना ७ ऑगस्ट रोजी कोर्टात हजर राहण्याचे आदेश संगमनेर न्यायालयाने दिले आहेत. आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी इंदोरीकर महाराजांविरोधात पीसीपीएनडीटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याची पहिली सुनावणी आज (३ जुलै) संगमनेर न्यायालयात झाली. मात्र आज केवळ समन्स बजावण्यात आला.

इंदोरीकर महाराज यांनी फेब्रुवारी महिन्यात पुत्र प्राप्तीबाबत वादग्रस्त वक्तव्य केले होते त्यांच्या या वक्तव्यावर आक्षेप घेत अनेक सामाजिक संघटना आणि अंधश्रद्धा निर्मूलनातील कार्यकर्त्यांनी इंदोरीकर महाराजांवर कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यानंतर अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पदाधिकारी त्यावर आज संगमनेर कोर्टात पहिली सुनावणी झाली. आज नेमके काय आदेश देणार याकडे सगळ्यांचे लक्ष असताना फक्त त्यांना समन्स बजावण्याची ऑर्डर काढण्यात आली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यात थंडीचा जोर वाढला, मुंबईत १२.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद

swarit

आमच्याकडे लपवण्यासारखं काही नाही, लपवाछपवी करणारे पळून जातात – संजय राऊत 

News Desk

राज्याचं मुख्यमंत्री पद स्वीकारताना ‘लय भारी’ वाटलं – मुख्यमंत्री

News Desk