HW News Marathi
महाराष्ट्र

राज्यातील कोणत्याही विकासकामांना स्थगिती नाही। मुख्यमंत्री

मुंबई। राज्यात सुरू असलेल्या समृद्धी महामार्ग, मुंबई, पुणे व नागपूरच्या मेट्रो प्रकल्पांसह कोणतेही पायाभूत सुविधा प्रकल्प रद्द करण्यात येणार नाहीत. ती कामे गतीने पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न असेल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी (३ डिसेंबर)माध्यमांना सांगितले. या प्रकल्पांचा मुख्यमंत्र्यांनी बैठकीत आढावा घेतला. तसेच आरेच्या कारशेडव्यतिरिक्त अन्य कोणत्याही कामाला स्थगिती दिलेली नाहीे. मात्र बुलेट ट्रेनबाबत आढावा घेऊन विचार करू, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग, मेट्रो, मुंबई ट्रान्सहार्बर लिंक, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ ही कामे सध्या सुरू आहेत. त्यांचा मुख्यमंत्र्यांनी आढावा घेतला. यावेळी छगन भुजबळ, जयंत पाटील, सुभाष देसाई, एकनाथ शिंदे या मंत्र्यांसह मुख्य सचिव अजोय मेहता व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. समृद्धी महामार्गाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या जीवनात समृद्धी यावी, असे मुख्यमंत्री म्हणाले.

मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, पायाभूत सुविधांच्या कामांआड आम्ही येणार नाही. मात्र, उपलब्ध निधी, त्याचा विनियोग व स्थानिकांना होणारा लाभ या बाबींचा विचार करून या कामांचा प्राधान्यक्रम ठरविणे आवश्यक आहे. कुठलाही विकास प्रकल्प राबवताना स्थानिकांना विश्वासात घ्यायला हवे. प्रशासन तळमळीने काम करते. मात्र, कामांची प्रगती व निधी यांचा ताळमेळ घालणे आवश्यक आहे. मेट्रोसाठी आवश्यक असलेल्या कारशेडच्या उभारणीत स्थानिकांना विश्वासात घेऊनच मार्ग काढण्यात येईल. त्यासाठी पुढाकार घेऊ . विकास कामांसाठी एक पाऊल उचलताना पुढच्या शंभर पाऊलांचा धोका ओढावून घेतोय का, याचाही विचार केला पाहिजे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाड दुर्घटनेत ज्यांची भूमिका महत्त्वाची ठरली त्या NDRF ची स्थापना शरद पवारांमुळेच झाली!

News Desk

ऐतिहासिक शक्ती विधेयकासह अधिवेशनात 24 विधेयके मंजूर – अजित पवार

Aprna

कर्मचाऱ्यांना पीपीई किट व मास्क द्यावे – अस्लम शेख

News Desk