HW News Marathi
देश / विदेश

जय जय पांडुरंग हरी ! पंतप्रधानांची विठ्ठल चरणी प्रार्थना

नवी दिल्ली | यंदाही आषाढी एकादशी साजरी होत आहे. पण, दरवर्षीसारखा आनंद यावर्षी नाही. चंद्रभागेचा काठ अगदी सूना पडला आहे. विठ्ठल मंदिर परिसरात देखील शांतता आहे. मात्र असे असले तरी प्रत्येकजण घरातूनच हात जोडून विठ्ठलाचे आशिर्वाद घेत आहे. आषाढी एकदशीच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वारकरी परंपरेच्या इतिहासाला उजाळा दिला आहे. विशेष म्हणजे जय जय पांडुरंग हरी म्हणत पंतप्रधान मोदी यांनी मराठीतून सर्वांना आषाढीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

“आषाढी एकादशी म्हणजे वारकरी परंपरेचे स्मरण करण्याचा दिवस. संत ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ, रामदास, तुकाराम आणि इतर अनेक संत ज्यांनी समानता आणि सामाजिक सलोखा यांची शिकवण देत आपल्याला सदैव प्रेरणा दिली, अशा सर्व संतांना नमन. आषाढी एकादशीच्या सर्वांना शुभेच्छा.विठ्ठलाच्या आशीर्वादाने गरीब आणि वंचितांना उत्तम आरोग्य आणि भरभराट लाभो. आपले जग आनंदी आणि आरोग्यदायी रहावे, या आपल्या निर्धाराला विठ्ठलाचे आशीर्वाद राहोत हीच विठ्ठल चरणी प्रार्थना. जय जय पांडुरंग हरी”, असे ट्विट करत मोदी यांनी आषाढी एकादशीच्या शुभेच्छा सर्व भाविकांना दिल्या आहेत.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“सकाळी पेपर वाचल्यावर अर्थमंत्र्यांना व्याजकपातीसंदर्भात समजलं असावं की..” – प्रियंका चतुर्वेदी

News Desk

विनायक मेटे फडणवीसांच्या इशाऱ्यावर जनतेची दिशाभूल करतायत !  

News Desk

बजेटमध्ये रेल्वेसाठी महत्त्वाच्या घोषणा

News Desk