HW News Marathi
देश / विदेश

एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात वाढ !

मुंबई | राज्यात कोरोनामुळे अनेक बदल झाले. असाच एक महत्त्वाचा बदल आजपासून (१ जुलै) झाला आहे. या बदलाचा मोठा झटका हा स्वयंपाकघरातील खर्चाला बसणार आहे. महिन्याच्या पहिल्या दिवशी सर्वसामान्यांच्या खिशात हात घालण्यात आला आहे. देशातील तेल विपणन कंपन्यांनी (एचपीसीएल, बीपीसीएल, आयओसी) एलपीजी सिलिंडर (एलपीजी गॅस सिलिंडर)च्या अनुदानात वाढ केली आहे.

दिल्लीत १४.२ किलो विना अनुदानित एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत एक रुपयांची वाढ करण्यात आली आहे. आता नवीन दर ५९४ रुपयांवर पोहोचले आहेत. दरम्यान, सातत्याने पेट्रोल-डिझेलमध्ये वाढ होत आहे. अन्य शहरात देखील घरगुती स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरच्या किमतीत वाढ झाली आहे.

कोलकत्तामध्ये ४ रुपये, मुंबई ३.५० रुपये आणि चेन्नईत ४ रुपयांनी सिलेंडर महागला आहे. तसेच, एक दिलासादायक बाब म्हणजे १९ किलोच्या सिलेंडरच्या किमतीत कपात करण्यात आली आहे.

IOC वेबसाइटवर दिलेल्या किंमतीनुसार दिल्लीतील सिलिंडरच्या किंमतीत एक रुपयांची वाढ झाली आहे. दिल्लीत आता १४.२ किलो विना अनुदानित एलपीजी सिलिंडरची किंमत ५९३ रुपयांवरून ५९४ रुपयांवर गेली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

विरोधकांच्या आघाडीचं कुणीही नेतृत्व केलं तरी त्यांना पाठींबा देऊच  –  ममता बॅनर्जी

News Desk

नारायण राणेंना तातडीने दिल्लीला बोलावणं, केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान निश्चित?

News Desk

परदेशात २७६ भारतीयांना कोरोनाची बाधा, एकट्या इराणमध्ये २५५ भारतीय रुग्ण

swarit