HW News Marathi
महाराष्ट्र

माझा अभ्यास कमी असला तरी कॉमन सेन्स का कॉमन आहे मला माहित नाही? उदयनराजेंचा भुजबळांना सवाल  

सातारा | भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना त्यांच्या एका विधानावर उत्तर दिलं आहे. “भुजबळ हे वयाने मोठे आहेत. माझा अभ्यास कमी असला तरी कॉमन सेन्स का कॉमन आहे मला माहित नाही”, असा टोमणा उदयनराजे भोसले यांनी लगावला आहे. उदयनराजे भोसले यांचा आरक्षणाचा अभ्यास कमी आहे, असं छगन भुजबळ म्हणाले होते. त्यावर उदयनराजेंनी भाष्य करत खरमरीत प्रत्युत्तर दिले आहे.

उदयनराजे म्हणाले, “छगन भुजबळ हे वयाने मोठे आहेत. त्यांचा गाढा अभ्यास आहे मी मान्य करतो. माझा अभ्यास कमी असला तरी कॉमन सेन्स का कॉमन आहे मला माहित नाही. इतरांबरोबर मराठा समाजाला पण न्याय मिळाला पाहिजे यात अभ्यास काय करायचा?”

“व्हाय इज कॉमन सेन्स कॉमन, खरंच मला कळत नाही. त्यांचा फार मोठा अभ्यास. कॉमन सेन्स त्यांचा काय कुणाचाच, मला त्यांच्यावर आरोप करायचा नाही. पहिल्यापासून आरोप प्रत्यारोप होत आहेत. मला त्यात जायचं नाही. मला एव्हढंच सांगायचं आहे, बाकीच्या समाजाचं जसं आरक्षण आहे, तसं मराठा समाजालाही न्याय मिळायला हवा, त्यात अभ्यासाचं काय?” असा सवाल उदयनराजे भोसले यांनी विचारला आहे.

काय म्हणाले होते छगन भुजबळ?

मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत उदयनराजेंचा अभ्यास कमी आहे, असं भाष्य छगन भुजबळ यांनी केलं होतं. उदयनराजे भोसले यांनी मराठा आरक्षण मिळायलाच हवं अशी भूमिका घेतलीत आहे. मराठा आरक्षणाबाबतच्या सरकारच्या भूमिकेवर सपाटून बोलणार आहे, असं उदयनराजे म्हणाले होते. आरक्षण हे गुणवत्तेनुसारच मिळाले पाहिजे, या भूमिकेचा पुनरुच्चारही त्यांनी केला होता.सर्वोच्च न्यायालयात ९ सप्टेंबरला झालेल्या सुनावणीत मराठा आरक्षणाला स्थगिती देण्यात आली होती. नोकरी आणि शैक्षणिक आरक्षणाला स्थगिती मिळाल्यामुळे राज्यातील मराठा आंदोलकांनी आक्रमक पवित्रा हाती घेतला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शिवसेनेने सरकारमध्ये राहून विरोधी पक्षासारखे वागू नये, सरकार स्थापनेच्या वर्धापनदिनानिमित्त भाजपची भूमिका

News Desk

शिवसंवाद यात्रेदरम्यान आदित्य ठाकरेंच्या ताफ्यावर हल्ला; आंबादास दानवेंचे पोलीस महासंचालकांना पत्र

Aprna

सेंद्रिय उत्पादनांना प्रोत्साहन देताना ग्राहकांची फसवणूक होणार नाही याची दक्षता घ्यावी! – डॉ.राजेंद्र शिंगणे

Aprna