मुंबई | महाविकासआघाडीचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शपथ घेणार आहे. मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे आज सायंकाळी साडेसहा वाजात शिवाजी पार्कवर शपथ घेणार आहेत. या शपथविधी सोहळ्यात मुख्यमंत्र्यांसोबत ६ मंत्री शपथ घणारे असल्याची माहिती राष्ट्रवादीचे जेष्ठनेते प्रफुल्ल पटेल यांनी माध्यमांना दिली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना या तिन्ही पक्षांच्या महाविकासआघाडीकडून प्रत्येकी २-२-२ नेते शपथ घेणार आहेत.
Praful Patel, NCP: State Cabinet Ministers will be announced in the coming days. Total six leaders, two from each party, will take oath today. #Maharashtra https://t.co/uWnjQEEsi5 pic.twitter.com/I7mhsSaj2v
— ANI (@ANI) November 28, 2019
मुख्यमंत्र्यांसोबत शिवसेनेकडून एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, राष्ट्रवादी काँग्रेसकडून छगन भूजबळ, जयंत पाटील आणि काँग्रेसकडून बाळासाहेब थोराव आणि नितीन राऊत हे मंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. महात्मा फुलेंच्या पुण्यतिथी निमित्त भुजबळ पुण्यातील फुले वाड्यात अभिवादन करण्यासाठी आले होते, त्यावेळी ते बोलत होते. भुजबळ म्हणाले. कुठले मंत्रिपद असेल याबाबत अजून काहीही ठरलेले नाही.
किमान समान कार्यक्रमामध्ये शेतकऱ्यांनी तात्काळ कर्जमाफी करण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले. यात अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांनाही भरीव मदत देण्याचा निर्णय या कार्यक्रमातून जाहीर करण्यात आले. विशेष म्हणजे शिवसेनेच्या जाहीरनाम्यातील १० रुपयांची थाळी आणि १ रुपयात क्लिनिक हेही आश्वासन पूर्ण करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. किमान समान कार्यक्रमासंदर्भात सांगण्यात राष्ट्रवादचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, शिवसेनेचे गटनेते एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादीचे मुंबई अध्यक्ष नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत घेतले आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.