मुंबई | मुंबई मेट्रो ३ कारशेडवरून उच्च न्यायालयाने ठाकरे सरकारला मोठा धक्का दिला आहे. मुंबई उच्च न्यायालयानं कांजूरमार्ग येथे केलं जाणार काम थांबवण्याचे आदेश MMRDA ला दिले आहेत. मुंबई उपनगर जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेल्या आदेशाला न्यायालयाने स्थगिती दिली आहे. न्यायालयाच्या या आदेशानंतर भाजपानं ठाकरे सरकारला घेरलं आहे. उद्धव ठाकरे यांनी जनतेची माफी मागावी तसेच आदित्य ठाकरे यांनी राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी भाजपकडून करण्यात आली आहे. भाजपचे नेते किरिट सोमय्या यांनी ही मागणी केली आहे.
फडणवीस सरकारच्या काळात मुंबई मेट्रो ३ चे कारशेड आरेमध्ये तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आरेमध्ये कारशेड उभारणीस विरोध झाला होता. त्यानंतर सत्तेत आलेल्या ठाकरे सरकारनं आरेतील कारशेड कांजूरमार्ग येथे हलवण्याचा निर्णय घेतला. येथील जमिनीवरून वाद सुरू झाला असून, मुंबई उच्च न्यायालयानं कांजूरमार्ग येथील काम थांबवण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे सरकारला धक्का समजला जात असून, भाजपानं हाच मुद्दा आता ऐरणीवर आणला आहे.
Metro Kanjur Car Shed Thackeray Sarkar to withdraw aquisition order. CM Uddhav Thackeray must apologise. Who will bear the delay/additional cost. Guardian Mantri Thackeray should resign @BJP4Maharashtra @Dev_Fadnavis @mipravindarekar @ChDadaPatil
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) December 16, 2020
मुंबई उच्च न्यायालयाने कामाला स्थगिती दिल्यानंतर भाजपाचे नेते किरीट सोमैय्या यांनी ट्विट करत पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. “ठाकरे सरकारला मेट्रो कारशेड जागा अधिग्रहणाचा आदेश मागे घ्यावा लागला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी जनतेची माफी मागायला हवी. ज्यांच्यामुळे अतिरिक्त खर्च वाढवणार आहे. त्याचबरोबर उशिरही होणार आहे. पालकमंत्री आदित्य ठाकरेंनीही राजीनामा दिला पाहिजे,” अशी मागणी किरीट सोमय्या यांनी केली आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.