HW News Marathi
महाराष्ट्र

फडणवीसांनी स्वीकारला मुख्यमंत्रिपदाचा पदभार, कर्करोगाशी झुंज देणाऱ्या महिलेला आर्थिक मदत

मुंबई | देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा मुख्यमंत्रिपदी विराजमान होऊन त्यांनी आज मुख्यमंत्रिपदाचा कार्यभार स्वीकारला आहे. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिली स्वाक्षरी वैद्यकीय सहाय्यता निधीच्या धनादेशावर केली आहे. दादरच्या श्रीमती कुसुम किरण वेंगुर्लेकर यांना एक लाख वीस हजार रुपयांचा धनादेश मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आला. यावेळी मुख्य सचिव अजॉय मेहता, अर्थ विभागाचे अप्पर मुख्य सचिव मनोज सौनिक, प्रधान सचिव भूषण गगराणी उपस्थित होते.

राज्यभरातून आलेल्या गरजूंना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत केली जाते. मात्र राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष बंद करण्यात आला. ‘कार्यालय बंद. चौकशी करू नये’, असा मजकूर असलेला कागद कक्षाच्या दारावर चिटकवण्यात आला होता. त्यामुळे राज्याच्या विविध भागांमधून मदतीच्या आशेने आलेल्या अनेकांचा गरजूंना निराश होऊन परत जावे लागत होते.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘‘काँगेसमुळेच दुःख, दैन्य, गरिबी आहे’’ असे वारंवार सांगणे हे बरोबर नाही !

News Desk

‘पुणे स्मार्ट सिटी’ची कामे दर्जेदार आणि वेळेत पूर्ण करा- अजित पवार

News Desk

“मेल्यावर साहेबांना काय सांगू? मुख्यमंत्री शिवसेनेचा पण…”, शिवसेनेला आमदाराचा घरचा आहेर 

News Desk