HW News Marathi
Covid-19

ठाकरे सरकारचा निर्णय! राज्यातील सर्व आशा सेविकांना २ हजार, तर आशा गटप्रवर्तकांना ३ हजार मानधन

मुंबई। कोरोनाच्या संकटात वैद्यकीय कर्मचाऱ्यांसोबत काम करणाऱ्या आशा सेविकांना अखेर ठाकरे सरकारने मोठा दिलासा दिला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज (२५ जून) झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आशा सेविकांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

महाराष्ट्रात सध्या ६५ हजार आशासेविका आहेत. आशा सेविका व गटप्रर्तकांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. १ जुलैपासून आशासेविकांच्या मानधनात २ हजार वतर आशा गटप्रर्तकांना दरमहा ३ हजार अशी वाढ करण्यात आली आहे, अशी माहिती राज्यमंत्री ट्विट करून दिली आहे. आशा सेविकांच्या मानधनवाढीसाठी १५७ कोटी ६० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून तशी तरतूदही करण्यात आली आहे.

गेल्या काही दिवसांपासून आशा वर्करच्या मोबदल्यात वाढ व्हावी, अशी मागणी होत होती. तसेच काही दिवसांपूर्वीच मनसे नेते अमित ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन आशा सेविकांचा प्रश्न मांडला होता.

पहिल्या फळीत कार्यरत असलेल्या आशा सेविकांना अखेर मोठा दिलासा मिळाला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आशा सेविकांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पदभरती, नव्याने इमारतींच्या विकासाद्वारे आरोग्य सेवा अधिक बळकट करणार! – राजेश टोपे

Aprna

‘ही’ लढाई जिंकायची असेल तर थोडी कळ तर काढावीच लागेल ! | मुख्यमंत्री

News Desk

युपीच्या लोकांना घेण्यास मुख्यमंत्री योगी टाळाटाळ करत आहेत !

News Desk