HW News Marathi
महाराष्ट्र

मराठा आरक्षण- सर्वोच न्यायालयात ५ न्यायमूर्तींच्या खंडपीठापुढे प्रथमच सुनावणी होणार 

नवी दिल्ली | मराठा आरक्षणासाठी आज महत्त्वाचा दिवस आहे. आज (९ डिसेंबर) सर्वोच्च न्यायालयात५ न्यायमूर्तींच्या खंडपीठापुढे प्रथमच सुनावणी होणार आहे. यातून मराठा समाजातील नागरिकांना दिलासा मिळणार का? याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष /लग्ल आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी मराठा आरक्षण कायद्याला सर्वोच्च न्यायालयानं अंतरिम स्थगिती दिली होती.

त्यानंतर मराठा आरक्षणाची सुनावणी घटनापीठाकडे वर्ग करण्यात आली होती. घटनापीठाच्या सुनावणीदरम्यान महाराष्ट्रात मराठा आरक्षणाची अंमलबजावणी करता येणार नसल्याचंही सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केले होते. यानंतर आता सर्वोच्च न्यायालयात पहिल्यांदाच सुनावणी होणार आहे.

मराठा आरक्षणाअंतर्गत २०२० आणि २०२१ मध्ये वैद्यकीय प्रवेश प्रकिया आणि नोकरी भरती करता येणार नाही, असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला होता. खंडपीठाच्या अंतिम निकालानंतरच मराठा आरक्षणाच्या कायद्याची अंमलबजावणी महाराष्ट्र सरकारला करता येणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

रिपब्लिक टीव्हीने पैसे देऊन TRP वाढवला, असत्यमेव जयते ! संजय राऊतांचे ट्विट

News Desk

अवघ्या १८ तासात २५ किमी डांबरी रस्ता पूर्ण, लिम्का बुकमध्ये नोंद!

News Desk

टोपे साहेब, परीक्षार्थींसाठी हेलिकॉप्टरची व्यवस्था कराच! भाजपचा संताप 

News Desk