मुंबई | लॉकडाऊननंतर देश अनलॉक करत हळूहळू सर्व पूर्पदावर आणण्याच्या प्रयत्न केला. मात्र, देशात अनलॉकनंतर कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढली आहे. देशात गेल्या २४ तासांत देशभरात कोरोनाचे तब्बल १४ हजार ८२१ नवे रुग्ण सापडले असून, या २४ तासांत ४४५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेस २४ तासांत कोरोनाच्या रुग्णांमध्ये तब्बल १४ हजार ८२१ नव्या रुग्णांची भर पडली आहे, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने आज (२२ जून) दिली आहे.
445 deaths and spike of 14,821 new #COVID19 positive cases reported in India in last 24 hrs.
Positive cases in India stand at 4,25,282 including 1,74,387 active cases, 2,37,196 cured/discharged/migrated & 13699 deaths: Ministry of Health pic.twitter.com/ucmSdlZRjI— ANI (@ANI) June 22, 2020
दरम्यान, देशात आता एकूण कोरोना रुग्णांची संख्या ४ लाख २५ हजार २८२ वर पोहोचली आहे. तर त्यापैकी १ लाख ७४ हजार ३८७ देशात सक्रिय रुग्ण आहे. देशात आतापर्यंत दोन लाख ३७ हजार १९६ जणांनी कोरोनावर मात केली आहे. दिवसभरात ४४५ जणांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागल्याने देशात कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंची संख्या १३ हजार ६९९ वर पोहोचली आहे.
तसेच देशात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण हे महाराष्ट्रात आहेत. राज्यात गेल्या २४ तासांत कोरोनाचे ३ हजार ८७० नवे रुग्ण सापडले असून, १०१ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या १ लाख ३२ हजार ७५ एवढी झाली असून, त्यामध्ये ६० हजार १४७ सक्रिय रुग्णांची संख्या आहे. तसेच तर ६५ हजार ७४४ रुग्णांनी कोरोनाला मात दिली आहे. राज्यात आतापर्यंत ६ हजार १७० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.