HW News Marathi
महाराष्ट्र

शिरोमणी अकाली दलचे प्रेमसिंग चंदू माजरा यांनी घेतली मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट

मुंबई | ‘एनडीए’तून बाहेर पडलेल्या दोन पक्षांची एकजूट होताना दिसत आहे. शिरोमणी अकाली दलाचे उपाध्यक्ष आणि खासदार प्रेमसिंग चंदू माजरा यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी मुंबईत आले. मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी ही भेट झाली. शेतकऱ्यांच्या सर्व आंदोलनांना शिवसेनेने पाठिंबा दिला असून दिल्लीच्या समन्वय बैठकीमध्येही शिवसेना सहभागी होणार आहे.

केंद्र सरकारने लागू केलेला कृषी कायदा मोडीत काढण्यासाठी देशातील सर्व स्थानिक पक्षांच्या प्रमुख नेत्यांची आम्ही भेट घेत आहोत. सर्व पक्षांनी एकत्र यावे, यासाठी आम्ही हे आव्हान करत आहोत” अशी प्रतिक्रिया खासदार प्रेमसिंग चंदू माजरा यांनी यावेळी दिली. शिरोमणी अकाली दलाची भूमिका मान्य असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे भेटीदरम्यान सांगितले आहे.

“राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचीही आम्ही आज भेट घेणार आहोत, मात्र ती झाली नाही तर दिल्लीमध्ये आम्ही देशातील सर्व स्थानिक राजकीय पक्षांची बैठक घेणार आहोत. त्या बैठकीचे नेतृत्व शिरोमणी अकाली दलाचे प्रमुख प्रकाशसिंग बादल हे करणार आहेत” अशी माहितीही माजरा यांनी दिली आहे.

दिल्लीच्या समन्वय बैठकीमध्ये शिवसेना सहभागी होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उपस्थित राहणार असल्याचं सांगितल्याची माहिती माजरा यांनी दिली. शरद पवारांपासून ममता बॅनर्जीपर्यंत अनेक पक्षांचे प्रमुख नेते, पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार असून ही बैठक पुढील दोन महिन्यात होणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भाजपचा दंगली घडवण्याचा डाव होता, प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप

News Desk

गुगल क्लासरुम सुरु करणारं महाराष्ट्र हे देशातील पहिलं राज्य ठरल्याचा सार्थ अभिमान !

News Desk

हाफीज धत्तुरे यांच्या निधनाने समर्पित नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले : अशोक चव्हाण

News Desk