HW News Marathi
Covid-19

कोरोना रुग्णाच्या ‘होम आयसोलेशन’करिता केंद्राच्या नव्या महत्त्वपूर्ण सूचना

नवी दिल्ली | कोरोना रुग्णांच्या होम आयसोलेशनबाबत केंद्राकडून आता अत्यंत महत्त्वपूर्ण सूचना जरी करण्यात आल्या आहेत. “काही राज्यांमध्ये अगदी सर्रासपणे होम आयसोलेशनला परवानगी दिली जात आहे. मात्र, यामुळे संबंधित रुग्णाच्या कुटुंबियांना किंवा शेजारच्यांनाही कोरोना संसर्ग होण्याचा धोका आहे. विशेषत: दाटीवाटीच्या वस्तीमध्ये ही भीती अधिक आहे. त्यामुळे, अशा दाटीवाटीच्या वस्त्यांमध्ये राहणाऱ्या रुग्णांना होम आयसोलेशनची परवानगी देऊ नये.संबंधित डॉक्टरांनी याबाबतची खात्री करून घ्यावी. “, अशा स्पष्ट सूचना केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांकडून सर्वच राज्यांना देण्यात आल्या आहेत. केंद्राकडून होम आयसोलेशनबाबत काही मार्गदर्शक तत्त्वे आता राज्यांना जारी करण्यात आली आहेत.

“संबंधित रुग्णाच्या होम आयसोलेशनबाबत निर्णय घेताना संबंधित डॉक्टरांनी त्याबाबतची खात्री करून घ्यावी. तो रुग्ण होम आयसोलेशन राहू शकतो का ? याबाबत विचार व्हावा. दाटीवाटीच्या वस्त्यांमध्ये राहणाऱ्या रुग्णांना होम आयसोलेशनची परवानगी दिली जाऊ शकत नाही. कारण, त्यामुळे रुग्णाचे कुटुंबीय, शेजारी तसेच जवळच्या संपर्कात येणाऱ्या लोकांनाही संसर्ग होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे, ज्या रुग्णांना होम आयसोलेशनची परवानगी देण्यात आलेली आहे, अशा रुग्णांच्या प्रकृतीची काळजी घेण्याकरिता डॉक्टरांची एक विशेष टीम कार्यरत असेल”, असेही लव अग्रवाल यांनी स्पष्ट केले आहे. तसे पत्रच केंद्राकडून सर्व राज्यांना पाठवण्यात आले आहे. कोरोना संसर्ग आणखी वाढू नये यासाठी या सूचना महत्त्वपूर्ण ठरतात.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मी राष्ट्रवादीचा प्रदेशाध्यक्ष होणार नाही !

News Desk

ओमिक्रॉनपासून बचावासाठी वैद्यकीय सुविधा सुसज्ज ठेवा! – डॉ. नितीन राऊत

Aprna

आषाढी वारीबाबत ३० मेला पुन्हा बैठक होणार

News Desk