HW News Marathi
महाराष्ट्र

पुणे पदवीधर मतदार संघ निवडणूकीत राष्ट्रवादीचे अरूण लाड यांचा विजय!

पुणे | राज्यात पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. महाविकास आघाडी सरकार आणि भाजप यांच्यात कमालीची लढत दिसून येत आहे. दरम्यान, पुणे पदवीधर मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अरूण लाड यांनी आघाडी घेत या निवडणूकीत विजय मिळवला आहे. अरूण लाड यांना १ लाख २२ हजार १४५ मते मिळाली आहेत. तर त्यांचे प्रतिस्पर्धी भाजपचे संग्राम देशमुख यांना ७३३२१ मते मिळवत पराभव स्वीकारावा लागला आहे. दरम्यान, या निकालाची अधिकृत घोषणा होणं बाकी आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अरूण लाड यांनी ४८ हजार ८२४ मतांची आघाडी घेत हा विजय मिळवला आहे. त्यांनी फेसबूक पोस्ट करत याचे सर्व श्रेय आणि हा विजय संपूर्ण महाविकास आघाडी, सर्व नेते, कार्यकर्ते पदाधिकारी आणि पाचही जिल्ह्यातील मतदारांचा आहे. आपण ज्या विश्वासाने मला प्रतिनिधी म्हणून निवडले तो विश्वास साध्य करण्यासाठी मी अहोरात्र काम करेन, असे या पोस्टमध्ये त्यांनी लिहिले आहे.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अकरावीच्या ऑनलाईन प्रवेश प्रकियेत अडचणी

News Desk

….हे तर देसाईंचे मत | मुख्यमंत्री

News Desk

“भाजपा राणेंच्या त्या वक्तव्याच्या पाठीशी नाही”, देवेंद्र फडणवीसांचं स्पष्टीकरण

News Desk