HW News Marathi
महाराष्ट्र

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू होण्याची शक्यता

मुंबई | राज्यात सत्ता स्थापनेचा संघर्ष अद्यापही सुरू आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केंद्रीय गृहमंत्रालयाला राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस केली आहे. राज्यपालांनी सर्वप्रथम भाजप, शिवसेनेला सत्तe स्थापन करण्याचे निमंत्रण दिले होते. मात्र, हे दोघेही सत्ता स्थापनेचा दावा करून शकले नाही. यानंतर राज्यपालांनी काल (११ नोव्हेंबर) राष्ट्रवादीला सरकार स्थापन करण्याचे निमंत्रण दिले. राष्ट्रवादीला आज (१२ नोव्हेंबर) सायंकाळी ८.३० वाजेपर्यंत सत्त स्थापन करण्यासाठीची वेळ मर्यादा दिली आहे.

मात्र, राज्यपालांनी दिलेला वेळ हा अपुरा असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले. वेळ कमी असल्यामुळे राज्यात आमदारांची जुळवाजुळव करण्यास वेळ लागणार असल्याचे अजित पवारांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. जर राष्ट्रवादी बहुमत सिद्ध करण्या अपयशी ठरले तर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होण्याची शक्यता वर्तवली जाते.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्याच्या विकासासाठी आता डबल इंजिन! – मुख्यमंत्री

Aprna

भारतीय नौसेनेत कोरोनाचा शिरकाव, २० नौसैनिक कोरोना पॉझिटिव्ह

News Desk

Kulbhushan Jadhav Verdict । १ रुपया वेतनात हरीश साळवे यांनी लढविला खटला

News Desk