HW News Marathi
महाराष्ट्र

विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन १४ आणि १५ डिसेंबरला मुंबईत होणार

मुंबई | हिवाळी अधिवेशन कधी आणि कुठे होणार असा प्रश्न होता. त्याचे उत्तर अखेर आले आहे. हिवाळी अधिवेशन १४ आणि १५ डिसेंबरला होणार आहे. हे अधिवेशन नागपूर ऐवजी मुंबईत होणार असल्याचे नक्की झाले आहे. विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन ७ ते ९ डिसेंबर या कालावधीत मुंबईतच होण्याची शक्यता होती. ७,८ आणि ९ डिसेंबर असे तीन दिवस अधिवेशन होण्याची शक्यता होती. मात्र, आता २ दिवसच हे अधिवेशन होणार आहे.

दरम्यान, भाजपने हिवाळी अधिवेशन किमान १५ दिवसांचे असावे अशी मागणी केली होती. तसेच, हे अधिवेशन नागपूरात व्हावे अशीही मागणी केली होती. मात्र, हिवाळी अधिवेशन आता मुंबईत २ दिवसांसाठी होणार हे निश्चित झाले आहे. आता यावरही भाजपकडून काय प्रतिक्रिया येणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरकारकडून तात्काळ १० हजार कोटीची मदत

News Desk

महाराष्ट्रात अगदी योग्य वेळी आपली सत्ता आली !

swarit

80 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक व 3,909 रिक्त पदांच्या पोट निवडणुका जाहीर

News Desk