मुंबई | एकीकडे मुंबईकर आणि सर्व चाकरमानी मुंबई लोकल कधी सुरू होते याच्या प्रतीक्षेत आहेत. अशातच लोकल बाबत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. लोकल सर्वसामान्यांसाठी कधी सुरु होणार याची प्रतिक्षा सर्वांनाच आहे. दिवाळी नंतरच्या आठवड्यांतील कोरोनाबाबतच्या आकड्यांमधला सकारात्मक कल लक्षात घेता प्रशासनाकडून मुंबईत लोकल सर्वांसाठी खुली करण्यासाठी हालचाली सुरु झाल्या आहेत. येत्या आठवड्यात या संदर्भात महत्त्वपूर्ण पार पडणार आहे. या बैठकीत लोकल सर्वसामान्यांसाठी सुरु करण्याची तारीख निश्चित होऊ शकते.
कोरोना महामारीमुळं गेल्या ८ महिन्यांपासून सर्वसामान्य मुंबईकरांसाठी लोकल बंद आहे. मात्र, आता मुंबईकरांना दिलासा देण्याचा विचार राज्य सरकार करत आहे. १५डिसेंबरपासून सर्वांसाठी लोकल सेवा सुरु करण्याचा विचार सरकार करत आहे. तशी माहिती मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी दिली आहे. सर्वांसाठी लोकल कधी सुरु होणार? याची वाट मुंबईकर चाकरमाणी पाहत होता. अशा चाकरमाण्यांना आता दिलासा मिळण्याची शक्यता आहे.दिवाळीसारख्या मोठ्या सणामध्ये लोकांचा गावी प्रवास झाला. मोठ्या प्रमाणात गाठीभेटी झाल्या. त्यामुळे दिवाळीनंतर कोरोना रुग्णांची संख्या वाढेल अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. त्यामुळे सर्वांसाठी लोकल सुरु करण्याचा निर्णय दिवाळीनंतर घेतला जाईल, असं सांगण्यात आलं होतं. त्यानुसार अजून दोन आठवडे कोरोनाचा संसर्ग आणि रुग्णांच्या संख्येवर लक्ष दिलं जाणार आहे.
त्याचबरोबर बाहेरच्या राज्यातून येणाऱ्या प्रवाशांची संख्याही वाढली आहे. त्यामुळे अजून काही दिवस संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवलं जाईल. दिवाळीनंतर कोरोना रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात होती. मात्र, गेल्या दोन आठवड्यातील आकडेवारी पाहिली तर मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या कमी होताना पाहायला मिळत आहे. त्यामुळे सर्वांसाठी लोकल सुरु करण्याचा निर्णय होईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे आता मुंबईकरांची लोकल सेवा सुरु होण्याची प्रतीक्षा लवकरच संपणार अशी चिन्हे दिसत आहेत.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.