HW News Marathi
महाराष्ट्र

अभिनेत्री उर्मिला मातोंडकर आज शिवसेनेत पक्ष प्रवेश करत हाती शिवबंधन बांधणार

मुंबई | अभिनेत्री उर्मिला मातोंडकर आज (१ डिसेंबर) शिवसेनेत पक्ष प्रवेश करणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान असलेल्या ‘मातोश्री’वर दुपारी १२ वाजता त्या हाती शिवबंधन बांधणार आहेत. त्यानंतर दुपारी ४ वाजता उर्मिला पत्रकार परिषद घेणार आहे. या पत्रकार परिषदेत उर्मिला मोठे खुलासे करण्याची शक्यता आहे. विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त 12 जागांमध्ये शिवसेनेच्या कोट्यातून उर्मिला मातोंडकरचं नाव देण्यात आलं आहे. त्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत उर्मिला शिवबंधन हाती बांधणार आहे.

काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उर्मिला मातोंडकर यांच्याशी दूरध्वनीवरुन चर्चा केली होती. अभिनेत्री कंगना राणावतने बॉलीवूड कनेक्शनच्या मुद्द्यावरुन आदित्य ठाकरे आणि शिवसेनेला लक्ष्य केले असताना उर्मिला मातोंडकर यांनी सर्वप्रथम तिच्या टीकेला प्रत्युत्तर दिले होते. याशिवाय, उर्मिला मातोंडकर यांचे वक्तृत्त्व, राजकीय समज आणि राज्यपालनियुक्त सदस्यपदासाठीचे निकष पूर्ण करण्याची क्षमता लक्षात घेऊन शिवसेना त्यांना विधानपरिषेदवर पाठवल्याचं म्हटलं आहे.

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसमध्ये प्रवेश करत उर्मिला मातोंडकरने उत्तर मुंबई मतदारसंघात भाजपचे खासदार गोपाळ शेट्टी यांच्यासमोर तगडं आव्हान उभं केलं होतं. पण लोकसभा निवडणुकीत उर्मिलाच्या वाट्याला पराभव आला. त्यानंतर काँग्रेसमधील अंतर्गत वादामुळे उर्मिलाने अवघ्या सहा महिन्यात पक्षाला रामराम ठोकला होता. मुंबई काँग्रेसच्या भल्यासाठी प्रयत्न करण्याऐवजी अंतर्गत राजकारण सोडवण्यासाठी काँग्रेसने माझ्या प्रतिमेचा गैरवापर करुन घेतला, असा दावा करत उर्मिला मातोंडकर यांनी अवघ्या सहा महिन्यात पक्षाला सोडचिठ्ठी दिली होती.

आम्ही उर्मिला मातोंडकर यांना संपर्क साधून विधान परिषदेवर जाण्याची ऑफर दिली होती. पण त्यांनी नकार दिला. राज्यसभेसाठी इच्छूक असल्याचं त्या म्हणाल्या. आता जर त्यांनी शिवसेनेची ऑफर स्वीकारली असेल तर त्याचं त्यांना स्वातंत्र्य आहे, असं मदत आणि पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं होतं.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

माजी गृहमंत्री अनिल देशमुखांचे ईडीला पत्र, चौकशीला गैरहजेरी

News Desk

पुण्यात सोमवारपासून १ ली ते ८ वीचे वर्ग पूर्णवेळ सूरू होणार; अजित पवारांची माहिती

News Desk

मन हेलावणारी पोलीस भरती

News Desk