HW News Marathi
Covid-19

भाजपचे जळगाव जिल्हाध्यक्ष आणि माजी आमदार हरिभाऊ जावळे यांचे निधन

मुंबई : भाजपचे जळगाव जिल्हाध्यक्ष आणि माजी आमदार, माजी खासदार हरिभाऊ जावळे यांचे निधन झालं आहे. बॉम्बे रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला.हरिभाऊ जावळे यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. त्यांच्यावर मुंबईच्या एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

हरिभाऊ जावळे हे दोन वेळेस आमदार तथा दोन वेळेस खासदार म्हणून निवडून आले होते. तसेच त्यांनी मधुकर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमनपद देखील भूषवले होते. हरिभाऊ जावळे यांच्यावर मुंबई उपचार सुरू असताना आज दुपारी 12:30 वाजेच्या सुमारास निधन झाले. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण जळगाव जिल्ह्यात हळहळ व्यक्त करण्यात आहे.

भाजप नेते हरिभाऊ जावळे यांच्या पश्चात कुटुंबात आई, पत्नी, एक मुलगी दोन मुले असा परिवार आहे. हरिभाऊ यांच्या आकस्मिक निधनाने भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारीमध्ये एकच शोककळा पसरली आहे. दरम्यान, हरिभाऊ जावळे यांची मागील वर्षी महाराष्ट्र कृषी व संशोधन परिषदेच्या उपाध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आल्यामुळे त्यांना कॅबिनेट मंत्रिपदाचा बहुमान मिळाला होता.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राजधानी दिल्लीत ३ दिवसांत तब्बल ५ हजार नवे कोरोनाबाधित

News Desk

अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ यांनी चीनवर घेतला चोरीचा आळ

News Desk

“राज्यात १ मेपासून लसीकरण तेव्हाच सुरु होऊ शकेल जेव्हा…” राजेश टोपेंनी केले सूतोवाच!

News Desk