HW News Marathi
महाराष्ट्र

आमदार भारत भालके यांच्या भेटीसाठी शरद पवार रूग्णालयात 

पुणे | पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भारत भालके यांची प्रकृती चिंताजनक आहे. भारत भालके यांना गेल्या महिन्यात कोरोनाची लागण झाली होती. त्यांनी कोरोनावर मात करुन घरी परतले. मात्र पुन्हा प्रकृती बिघडल्याने काही दिवसापूर्वी त्यांना पुण्यातील रुबी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. इथे त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार भालके यांच्या भेटीसाठी रूग्णालयात गेले आहेत.

भारत भालके यांची कोरोना चाचणी 30 ऑक्टोबरला पॉझिटिव्ह आली होती. मात्र लगेचच 4 नोव्हेंबरला ते कोरोना मुक्त झाले आणि घरी आले होते. परत गेल्या आठवड्यात त्यांना त्रास जाणवू लागल्याने रुबी रूग्णालयात दाखल झाले. कालपासून त्यांची तब्येत खालावल्याचे सांगण्यात येत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

इतरांचे ट्विट समजण्यासाठी स्वत:चे ट्विटर स्वत: वापरावे लागते, राऊतांचा पुन्हा कंगनाला टोला 

News Desk

परमबीर सिंग हे दिल्लीत कुणाकुणाला भेटले याची माहिती आमच्याकडे; योग्यवेळी सत्य बाहेर येईल…

News Desk

९०० ई-बसेसमध्ये ३६०० कोटींचा घोटाळा; मिहीर कोटेजा यांचा आदित्य ठाकरेंवर आरोप

Aprna