HW News Marathi
महाराष्ट्र

चंद्रकांत पाटील आणि सुधीर मुनगंटीवार आज राज्यपालांना भेटणार

मुंबई । “महाराष्ट्राच्या जनतेने महायुतीला जनादेश दिला आहे. गोड बातमी कधीही येऊ शकते,” असा ठाम विश्वास राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा या निवासस्थानी काल (६ नोव्हेंबर) भाजपच्या कोअर कमिटीची बैठक पार पडली होती. या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांच्या वतीने राज्यात नवे सरकार स्थापन करण्याविषयीच्या तयारीची माहिती देण्यासाठी मी आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आज (७ नोव्हेंबर) दुपारी २ वाजता राज्यपालांची भेट घेणार असल्याची माहिती मुनगंटीवार यांनी दिली.

‘वाघ कुठलाही असो कुणाचाही असो संरक्षण-संवर्धन होणारच’, असे सूचक वक्तव्य मुनगंटीवार त्यांनी यावेळी केले आहे. या भाजपने चर्चेसाठी दिलेल्या आमंत्रणावर शिवसेनेने अजून सकारात्मक प्रतिसाद दिलेला नाही. तरी नाराजी दूर करण्यात आम्ही यशस्वी होऊ, असा आत्मविश्वास देखील मुनगंटीवारांनी व्यक्त केला आहे. भाजपच्या कोअर कमिटीची बैठक काल दुपारी बोलावण्यात आली होती. या बैठकीनंतर सुधीर मुनगंटीवार यांनी बैठकीत झालेल्या चर्चेची माहिती दिली. राज्यातील निवडणुकांवरही बैठकीत चर्चा झाली. पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांच्या निवडीवरही चर्चा करण्यात आली. ३१ डिसेंबरपर्यंत नवीन प्रदेशाध्यक्षांची निवड करण्यात येणार असल्याची माहिती देखील मुनगंटीवार यांनी माध्यमाना दिली.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शिवेंद्रराजे यांना राष्ट्रवादीच्या मोठ्या नेत्याकडून पक्षात येण्याची ऑफर

News Desk

‘यहा के हम सिकंदर’; खेलो इंडियामध्ये कोल्हापूरच्या पूजाच्या नावे 6 पदक

Aprna

मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमिवर उपमुख्यमंत्र्यांच्या घरासमोर ढोल बजाव आंदोलन केले जाणार 

News Desk