HW News Marathi
Covid-19

जळगावात कोविड रुग्णालयात शिरले पावसाचे पाणी, रुग्णांचे झाले प्रचंड हाल

मुंबई | जळगावात मुसळधार पावसामुळे गोदावरी रुग्णालयात काल (१३ जून) रात्री पावसाचे पाणी शिरले होते. महत्वाचे म्हणजे गोदावरी रुग्णालयात कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. या रुग्णालयातील तळमजल्यावर पाणी शिरल्याने रुग्णांचे प्रचंड हाल झाले. या रुग्णालयातील तळमजल्यावरील सर्व रुग्णांना रात्री रस्त्यावर काढावी लागली होती. दरम्यान, रुग्णालयात पाणी शिरल्याने एक व्यक्ती रुग्णाला स्ट्रेरने रुग्णालयातून बाहेर काढत असल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडिओ भाजपचे आमदार राम कदम यांनी ट्वीट करत महाविकासआघाडीवर टीका केली आहे. “महाविकासआघाडीने ने सबको भगवान भरोसे छोड़ दिया है,” असे ट्वीट त्यांनी केले आहे.

 

तळमजल्यातील वॉर्डमध्ये गुडघ्या एवढे पाणी साचले. त्या ठिकाणी असलेल्या रुग्णांना भर पाण्यातून बाहेर काढताना रुग्णालय प्रशासन आणि रुग्णांच्या नातेवाईकांची मोठी तारांबळ उडाली. गोदावरी रुग्णालयाच्या आजूबाजूला डोंगर असून डोंगरावरुन येणारे पाणी रुग्णालयात शिरल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे गोदावरी रुग्णालयाची वैद्यकीय व्यवस्था पूर्णपणे कोलमडली. दरम्यान, रुग्णालयात पाणी शिरल्याने एक व्यक्ती रुग्णाला स्ट्रेरने रुग्णालयातून बाहेर काढत असल्याचा व्हिडीओ समोर आला आहे.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

श्रमिकांसाठी आत्तापर्यंत ५४२ विशेष ट्रेन सोडल्या, रेल्वेमंत्र्यांनी दिली माहिती

News Desk

देशात गेल्या २४ तासात ६७६७ रुग्णांच्या संख्येत सर्वाधिक वाढ, तर १४७ जणांचा मृत्यू

News Desk

सरकार टिकवणे ही फक्त शिवसेनेचीच जबाबदारी नाही ! मुख्यमंत्र्यांची पवारांकडे नाराजी

News Desk