HW News Marathi
महाराष्ट्र

राज्यात आज ३,४२७ नव्या कोरोनाबाधितांची नोंद

मुंबई | राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा सातत्याने वाढत आहे. राज्यात आज (१३ जून) तब्बल ३,४२७ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडाआता १ लाख ४ हजार ५६८ वर पोहोचला आहे. दिलासादायक बाब अशी कि, गेल्या २४ तासांत राज्यात नवीन १,५५० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोनामुक्त झालेल्यांचा एकूण आकडा आता ४९,३४६ वर पोहोचला आहे. तर राज्यातील एकूण ऍक्टिव्ह रुग्णांचा आकडा ५१,३७९ इतका आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ट्विटरच्या माध्यमातून याबाबतची अधिकृत माहिती दिली आहे.

राज्यात गेल्या २४ तासांत ११३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. या मृत्यूंपैकी सर्वाधिक म्हणजे ६९ रुग्ण एकट्या मुंबईत, ठाण्यात ३, पुण्यात १०, नवी मुंबई ८, कल्याण-डोंबिवलीत १, पनवेल ६, सोलापूर ८, सातारा १, औरंगाबाद ३, लातूर २, नांदेड १, यवतमाळमध्ये १ कोरोनाबाधिताचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. या ११३ मृतांपैकी ७३ पुरुष आणि ४० महिलांचा समावेश आहे. यांपैकी ८३ जणांना मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोगासह अन्य व्याधी होत्या. तर १० रुग्णांच्या अतिजोखमीच्या आजारांबद्दल माहिती उपलब्ध नाही.

राज्यात प्रायव्हेट लॅब्समध्ये आता फक्त २२०० रुपयांत कोरोना चाचणी

“संपूर्ण देशात आता केवळ महाराष्ट्रातच कोरोना चाचणीसाठी इतके कमी दर आकारले जाणार आहेत. खरंतर, या आधीपर्यंत राज्यात प्राव्हेट लॅब्समध्ये कोरोना चाचणीचे दर ४,५०० रुपये इतके होते. तर एखाद्या रुग्णाची घरी जाऊन स्वॅब टेस्ट केल्यास त्याचा दर ५, २०० रुपये इतका आकारला जात होता. मात्र, आरोग्य विभागाने गठीत केलेल्या ४ सदस्यीय समितीने अभ्यास करून एक अहवाल राज्य सरकारकडे सादर केला. त्यामुळे, आता राज्यातील प्रायव्हेट लॅब्समध्ये कोरोना चाचणीसाठी जास्तीत जास्त २,२०० रुपये तर घरी जाऊन स्वॅब टेस्ट केल्यास जास्तीत जास्त २,८०० रुपये आकारले जातील. सर्वसामान्यांना निश्चितच यामुळे दिलासा मिळेल”, असे समाधान आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी व्यक्त केले आहे.

महाराष्ट्रात कोरोनाच्या सर्वाधिक चाचण्या

देशात महाराष्ट्रात कोरोनाच्या सर्वाधीक चाचण्या केल्या जात असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. सध्या राज्यात सध्या ५३ शासकीय आणि ४२ खाजगी अशा एकूण ९५ प्रयोगशाळा कोरोना निदानासाठी कार्यरत आहेत. आतापर्यंत ६ लाख २४ हजार ९७७ नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी १ लाख ०१ हजार १४१ नमुने पॉझिटिव्ह (१६.१८ टक्के ) आले आहेत. मुंबईमध्ये सर्वाधिक चाचण्या झाल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. राज्यात आयसीएमआरच्या मार्गदर्शीक सूचनांनुसारच चाचण्या होत असून त्यात कुठलीही तडजोड केली जात नसल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

वंचित बहुजन आघाडीकडून आज महाराष्ट्र बंदची हाक

swarit

देशाचे आधारस्तंभ घडविण्याचे काम सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या उपकेंद्राद्वारे होणार! मुख्यमंत्री

News Desk

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ गायकवाड यांचं निधन

News Desk