नवी दिल्ली | काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांचे आज (२५ नोव्हेंबर) पहाटे ३.३० वाजता निधन झालं आहे. त्यांचे पूत्र फैजल पटेल यांनी त्यांच्या ट्विटरवरुन याबाबत माहिती दिली आहे. महिनाभरापूर्वी अहमद पटेल यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. पटेल त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. जास्त त्रास सुरु झाल्यानंतर त्यांना मेदांता रुग्णालयातील आयसीयूमध्ये हलवण्यात आले होते. गेल्या काही दिवसांमध्ये त्यांचे अनेक अवयव निकामी झाले होते. अहमद पटेल यांचं निधन वयाच्या ७१ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. अहमद पटेल हे गांधी घराण्याचे निकटवर्तीय होते. दिल्लीतल्या रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.
फैजल पटेल यांनी याबाबत ट्विट केले आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, “आपणास कळवताना आम्हाला अतिशय दु:ख होत आहे की, माझ्या वडिलांचे निधन झाले आहे. आज 25 मे रोजी पहाटे 3.30 वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला”. फैजल पटेल यांनी पुढे लिहिले आहे की, “मी आमच्या सर्व शुभचिंतकांना विनंती करतो की, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अंत्यदर्शनसाठी येताना गर्दी होणार नाही याची सर्वांनी काळजी घ्यावी”.
Senior Congress leader Ahmed Patel passes away, tweets his son Faisal Patel. pic.twitter.com/4QgyLxvPis
— ANI (@ANI) November 24, 2020
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.