नवी दिल्ली | जगात कोरोनाबाधितांची संख्या ७७ लाखांच्या तर देशात ३ लाखांच्या पुढे गेली आहे ,कोरोनावर लवकरात लवकर लस तयार करण्यासाठी जगभरात संशोधन सुरू आहे. . दरम्यान, पतंजली आयुर्वेद कंपनीचे को-फाउंडर आचार्य बालकृष्ण यांनी आता कोरोनावरऔषध तयार केल्याचा दावा केला आहे.
आचार्य बालकृष्ण म्हणतात की, ‘पतंजलीच्या औषधाने शेकडो रुग्ण बरे झाले आहेत. या औषधाचा क्लिनिकल कंट्रोल ट्रायलचा रिझल्ट देखील येणार आहे. मात्र, आतापर्यंत औषध घेतलेल्या 80 टक्के रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे’.
आचार्य बालकृष्ण यांनी सांगितल्याप्रमाणे आतापर्यंत पतंजली रिसर्च इन्स्टिट्यूटने त्यांच्या औषधाने बरे झालेल्या कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांचा डेटा तयार केला आहे त्याचपद्धतीने कोरोनामधील वेगवेगळ्या टप्प्यांचा आणि सर्व वयोगटातील लोकांचा डेटा आहे. यासह, शेकडो लोकांवर क्लिनिकल चाचण्या सुरु करण्यात आल्या आहेत.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.