HW News Marathi
Covid-19

महाराष्ट्रासह अनेक राज्यांनी कोरोना परिस्थितीचा अहवाल सर्वोच्च न्यायालयात सादर करण्याचे आदेश

नवी दिल्ली | देशात कोरोनाचा प्रसार पुन्हा एकदा वेगाने होऊ लागला आहे. लॉकडाउनच्या काळातील बंधनं शिथिल केल्यानंतर रस्त्यांवर गर्दी होऊ लागल्यानं कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे. देशातील १० राज्यांमध्ये सर्वाधिक रुग्ण आढळून येऊ लागले असून, यात राजधानी दिल्ली पहिल्या क्रमांकावर आहे. महाराष्ट्रातही करोना रुग्णांच्या संख्येत वेगानं वाढ होत असून, सर्वाधिक रुग्ण आढळून येणाऱ्या पहिल्या पाच राज्यांमध्ये महाराष्ट्राचाही समावेश आहे.

कोरोना रुग्णांवरील उपचार व मृत्यू मृतदेहांच्या हाताळणीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर न्यायमूर्ती अशोक भूषण यांच्या अध्यक्षतेखाली न्यायमूर्ती आर.एस. रेड्डी व एम. आर. शाह यांचा समावेश असलेल्या खंठपीठासमोर सुनावणी झाली. यावेळी न्यायालयानं दिल्ली, महाराष्ट्र, गुजरात आणि आसाम या राज्यातील कोरोना परिस्थितीवर चिंता व्यक्त केली. चार राज्यांमध्ये संसर्गामुळे परिस्थिती नियंत्रणाबाहेर चालली असून, राज्यांनी दोन दिवसांत अहवाल सादर करावा, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

“दिल्लीतील परिस्थिती नोव्हेंबरमध्ये अधिक बिकट झाली आहे. प्रादुर्भाव रोखण्यासाठी काय उपाययोजना केल्या याचा अहवाल सरकारनं दाखल करावा,” असे निर्देश न्यायालयानं दिल्ली सरकारची बाजू मांडणारे महाधिवक्ता संजय जैन यांना दिले. करोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येला रोखण्यासाठी केंद्र आणि राज्यांनी सर्वोतोपरी प्रयत्न करावेत,” असे आदेश न्यायालयानं दिले आहेत.

देशात गेल्या २४ तासांत ४४ हजार ५९ आढळून आले आहेत. तर ५११ जणांचा मृत्यू झाला आहे. करोनाच्या संसर्ग वाढला असून, अनेक राज्यांमध्ये निर्बंध लागू करण्यास सुरूवात झाली आहे.आरोग्य मंत्रालयानुसार देशातील १० राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांत एकूण रुग्णांपैकी ७७ रुग्ण आढळून आले आहेत. तर ७६ टक्के मृत्यूही या दहा राज्यांमध्ये झाले आहेत. यात सर्वाधिक मृत्यू दिल्लीतच झाले आहेत.

नवी रुग्णसंख्या वाढीमुळे देशातील एकूण रुग्णांची संख्या ९१ लाख ३९ हजार ८६६ इतकी झाली आहे. यात ८५ लाख ६२ हजार ६४२ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर गेल्या २४ तासांत ४१ हजार २४ रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. सध्या ४ लाख ४३ हजार ४८६ रुग्ण उपचार घेत आहेत. देशातील एकुण मृतांचा आकडाही १ लाख ३३ हजार ७३८ वर पोहोचला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जंगलचा राजा सिंह कोरोनाच्या जाळ्यात, चेन्नईच्या प्राणिसंग्रहालयात सिंहिणीचा मृत्यू, ९ सिंह पॉझिटिव्ह

News Desk

देशात गेल्या २४ तासांमध्ये कोरोनाचे ९८५१ नवे रुग्ण, तर २७३ जणांचा मृत्यू

News Desk

राज्यात आज २३ हजारांपेक्षा जास्त रुग्ण बरे झाले

News Desk