HW News Marathi
महाराष्ट्र

राज्य सरकारला जागे करण्यासाठी मनसेचे हॉर्न वाजवा आंदोलन

मुंबई | कोरोना राज्यात थैमान घालत आहेच. आणि दुसरीकडे राजकारणात अनेक गोष्टी घडत आहेत. महाविकास आघाडीच्या सरकारविरोधात आता मनसे रस्त्यावर उतरणार आहे. राज्य सरकारला जागे करण्यासाठी हॉर्न वाजवा (MNS Horn OK Please) आंदोलन करण्यात येणार आहे. कोरोनामुळे आधीच संकट ओढवले आहे.

वाहतूक व्यवसाय अडचणीत आला आहे. त्यामुळे वाहतूक व्यवसायातील लोकांचा आक्रोश बहीऱ्या राज्य सरकारच्या कानावर जावा, झोपेचं सोंग घेतलेले सरकार खडबडून जाग व्हावे यासाठी हे आंदोलन करण्यात येणार असल्याची, अशी माहिती महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेना अध्यक्ष संजय नाईक यांनी दिली.

कोरोना संकट आणि त्यात लॉकडाऊमुळे डबघाईला आलेल्या वाहतूक व्यवसायाला पुन्हा उभारी मिळावी यासाठी राज ठाकरे यांच्या मनसेने हे पाऊल उचलले आहे. उद्या (१२ जून) संध्याकाळी ५ वाजता हे आंदोलन करण्यात येणार आहे. मनसे नवनिर्माण वाहतूक सेनेच्यावतीने फक्त १ मिनिट हॉर्न वाजवणार आहे. ‘फक्त एक मिनिट हॉर्न वाजवा आंदोलन’ हे पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांची स्वतःची लढवय्या ओळख दाखवणारे आंदोलन असेल, असे संजय नाईक म्हणालेत.

महाराष्ट्र सैनिकांनी तसेच वाहनचालक – मालकांना आवाहन करण्यात आले आहे. मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी व्हावे. आंदोलन करताना #MNSHornOKPlease हा हॅशटॅग वापरा आणि आंदोलन यशवी करावे, असे आवाहन वाहतूक सेना अध्यक्ष संजय नाईक यांनी केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सुशासन नियमावलीचा मुख्यमंत्र्यांकडून आढावा

Aprna

शरद पवारांना रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज

News Desk

केंद्राला आरक्षण द्यायचं नसेल तर घटना दुरुस्ती करुन राज्याला अधिकार द्या, राष्ट्रवादीची मागणी

News Desk