HW News Marathi
महाराष्ट्र

बावनकुळेंवर अन्याय झाला तेव्हा इतका गलबललो नव्हतो, अमोल मिटकरींचे सुचक ट्विट

मुंबई | वीजबिलाच्या मुद्द्यावरुन सध्या राजकारण चांगलेच तापले आहे. महाविकास आघाडी सरकराच्या विरोधात भाजप आणि मनसे वाढीव वीजबिलाच्या मुद्यावरुन आक्रमक झालेले पाहायला मिळाले आहेत. तर, माजी उर्जामंत्री आणि भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी असं म्हटलं होतं की, उर्जामंत्री तयार आहेत वीज बिल माफीसाठी मात्र मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडून परवानगी मिळत नाही आहे. बावनकुळेंच्या या वक्तव्यावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनी ट्विट केले आहे.

बावनकुळे आणि दरेकरजी या दोघांना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नितीन राऊत व काँग्रेसची किती काळजी आहे हे पाहुन माझ्या मनाला गलबलुन आले. इतका मी त्यावेळी गलबललो नव्हतो जेव्हा बावनकुळेवर अन्याय झाला होता. मात्र आज खरंच डोळे पाणावले माझे, असे ट्विट अमोल मिटकरी यांनी केली आहे. दरम्यान, भाजप सत्तेत असताना आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतना त्यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांची स्तुती केली होती. मात्र, २०१९ च्या विधासभा निवडणूकीत बावनकुळेंना तिकिट का दिले नाही असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. यावरुनच अमोल मिटकरींनी चंद्रशेखऱ बानवकुळेंना टोमणा लगावला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“फडणवीसांच्या सगळ्या गोष्टी मला माहित आहेत”, नाना पटोलेंचं सूचक विधान

News Desk

भाद्रपद महिन्यातल्या कुत्र्याला देखील लाज वाटते, पण धनंजय मुंडेंना लाज वाटत नाही!

News Desk

आंतरजातीय विवाह केल्यास जीवे मारण्याची धमकी, मुलीची आई-वडिलांविरोधात न्यायालयात धाव

News Desk