HW News Marathi
महाराष्ट्र

खुशखबर ! बेस्टची भाडेवाढ नाही

मुंबई | बेस्ट समितीने काल (२९ ऑक्टोबर) झालेल्या बैठकीत बोनस जाहीर करताना अर्थसंकल्प मांडण्यात आला होता. बेस्टने तिकीट दरात केलेल्या कपातीमुळे प्रवासी संख्या वाढली. मात्र, भाडेतत्त्वावर घेतलेल्या बसगाड्या आणि भाडेकपातीचा आर्थिक फटका बसला आहे. पण, बेस्ट तिकीटात वाढ करण्यात येणार नाही. त्यामुळे सन २०२०-२०२१ या आर्थिक वर्षात तब्बल २२५० कोटी रुपयांची तूट बेस्ट उपक्रमाला सहन करावी लागणार आहे. बेस्टने नवीन जाहीर केलेल्या अर्थसंकल्पात कोणतीही भाडेवाढ करण्यासंदर्भात नमूद करण्यात आले नाही.

यंदाच्या अर्थसंकल्पात परिवहन विभागाचे उत्पन्न १,४९५ कोटी रुपये इतके नमूद केले आहे. तर एकूण खर्च ३,८४५ कोटी रुपये इतका दाखवला आहे. विद्युत पुरवठा विभागाचे उत्पन्न ४,०६३ कोटी रुपये, तर एकूण खर्च ३,९६३ कोटी दाखवला आला आहे. बेस्टच्या या अर्थसंकल्पात परिवहन विभागाची तूट २,३४९ कोटी रुपये इतकी अपेक्षित आहे. तर विद्युत विभागाला ९९ कोटी रुपयांचा नफा अपेक्षित आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

INS विक्रांत प्रकरण ताजं असतानाच किरीट सोमय्यांची ED च्या कार्यालयात धाव; पण कारण काय?

Manasi Devkar

आज अधिवेशनात सावरकरांच्या अभिवादनाचा ठराव मंजूर होणार का?

Arati More

उद्याची सक्षम पिढी निर्माण करण्यासाठी सर्वसमावेशक शिक्षण द्या! – अजित पवार

Aprna