HW News Marathi
Covid-19

जगात कोरोना रुग्णांची संख्या ७३ लाखांवर पोहोचली, तर ४ लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू

मुंबई | जगभरात कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या २४ तासांत १ लाख २१ हजार कोरोनाचे नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर कोरोनामुळे ४ हजार ७५७ लोकांचा मृत्यू झाला आहे. जगभरात आतापर्यंत ७३ लाख लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. मात्र, ४ लाख १२ हजार लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे, अशी माहिती वर्ल्डोमीटरने दिलेली आहे.

अमेरिकेत आतापर्यंत २० लाख लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर एक लाखांहून अधिक लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच अमेरिकेत गेल्या २४ तासांमध्ये १९०५६ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर १०९३ लोकांचा मृत्यू झाला आहे. ब्राझीलमध्ये संसर्ग वेगाने पसरत आहे. मात्र, आता अमेरिकेपाठोपाठ ब्राझील कोरोनाचे नवे केंद्र बनले आहे. अमेरिकेपेक्षाही ब्राझीलमध्ये कोरोना रुग्ण वाढीचा वेग जास्त असून कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या देखील जास्त आहे. ब्राझीलमध्ये गेल्या २४ तासांमध्ये ब्राझीलमध्ये ३,१३९ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर ११८५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

जगातली ब्राझील, रूस, स्पेन, यूके, इटली, भारत, पेरूमध्ये कोरोना बाधितांची संख्या दोन लाखांच्या पार गेली आहे. याव्यतिरिक्त सात देश असे आहेत. जिथे एक लाखांहून अधिक कोरोनाचे रुग्ण आहेत. अमेरिकेमध्ये मृतांचा आकडा १.१४ लाखांच्या पार पोहोचला आहे. चीन टॉप १७ कोरोना बाधित देशांच्या यादीतून बाहेर पडला आहे. तर भारताचा टॉप सहा देशांमध्ये समावेश झाला आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राज्यातील चारही कृषी विद्यापीठांचा कृती आराखडा तयार

News Desk

कोरोनामुक्त गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांचा ‘प्लाझ्मा दान’करण्याचा निर्णय …

News Desk

राजकीय नेत्यांच्या घरी जाऊन लस कोणी दिली? मुंबई हायकोर्टाचा राज्य सरकारला सवाल

News Desk